दुसरें कितेक सेना घेऊन जाऊन राजास मोकळें करावें म्हणावयाची हावही धरून जिजाई आऊसाहेब पनाळास जाणेस सित्ध जाहले. पुन्हा आऊसाहेबानीं केली तजवीज जे सं वामगड चक्रावतीदुर्ग शास्ताखानाचें हातास लागल्यासें दिसतें। पुनेसी सरल्ली सूपगावें हेही ताम्रमुखाचा हातास लागले। शिवाजीराजे पनाळी वेढेंत आहेत करितां आपण जाऊन सोडवावे म्हणून निश्चय केले। तेव्हां राजाचा सेनापती नेतोजी ह्मण्णार हिलालखाना समवेत येऊन नम्रतेनें नमस्कार केला । मातोश्रीं त्या दोघांपहून माझा लेंक तुमचा यजमान पनळगडी शत्रुशी युत्ध करितो, तुम्ही उभयतां लांज नाहींसें भीऊन अपला प्राणच थोरसा समजून पळून आलां कीं त्यास्तव मीच जाउन माझ्या लेंकास सोडवितें, म्हणतां व सेनापतीनी मातोश्रीचे प्रथम राजे असाध्य शूर त्यास्तव त्यांचे निरोपावरून विजय गड जिंतून ये प्रांती तांम्रमुखीसी युत्ध करणेस आले । अपण येथेंच अमुचें संरक्षण करावें । पनाळास न जावें. नाहींतरी अमचे सैनीक समर्थ ताम्रमुखासी जिंतून गड किल्ले घेऊं सकनात आम्हीच यजमानासमीप जातोसें राजमातेस विज्ञापना करून पनाळेस निघाले। तेव्हां सेनापतीसह सेंन्ये येणेचें वृतजोहरखान अैकून व कांहीं सैन्य पाठऊन मार्गी निरोधीतांच उभयतां सैन्यासही अद्भुत युत्ध जाहलें । त्या युत्धीं दिलालखानाचा पुत्र अनेक पराक्रम करून घायानें घाबरी जाहला । त्याला यवनाचे लोकांनीं धरूनि नेले । हें वर्तमान कळूनही सोडवणेंस शक्त न जाहले । हे वर्तमान राजानांही। अैकून व्यसनानें रात्री निद्रिस्त असतां श्रीतुळजाभवानी स्वप्नी येऊन “अरे लेंकरा तुझी माय राजगडांत तुजलागी पाहावे ह्मणून बहुत कष्टीं होते, आतांच मातोश्रीचे भेटीस स्वल्प सैन्य समवेत जातेसमई शत्रूस मी मोहवितें, जोहरही कारणामुळें नाश पावेल,''ह्मणतांच राजे जागृत होऊन श्रीदेवीस सांष्टांग नमस्कार करून पुना प्रांत ताम्रमुखानी आक्रमिले असते अह्मी येथें असणें विहित नव्हे. ही तजवीज करून त्र्यंबक भास्कर यास