यानावनिशीचे समग्र देऊन शास्ताखानास निरोपिले जे शिवाजीकडील नेतोजी बाछाई मुलुकांत करावयाची घुदाईस शतांशानें अधीक पुणें प्रांतीं जाळणें लुटणें येणेंप्रमाणे करीत जयवल्ली चक्रावती प्रांतावरून तो प्रांत समग्र सावून पनाळास जाऊन शिवाजीचें पारपत्य करा ह्मणून खास्ताखानास भारी फौज देऊन पाठविले । त्यानिहीं आपल्यास झाल्या हुकमापेक्ष्या जास्ती घरदाया करीत मुलूखही बांधीत चक्रावती प्रांतास चालिले; येणेंप्रमाणें आज्ञापित होऊन बाछाईचा मामा शास्ताखान् निघावयाचें वर्तमान अल्लीयदल्शाहास कळून अतां पणाळांत आहे त्या शिवाजी राजास हें वर्तमान कळतांच आपण निघुन समोर जाऊन शास्ताखानास येऊं देईना तेथेंच रोधील करितां त्याला पणाळांतून बाहेर निघनासें करावें ह्मणून कनोळचे जोहरखानास लिहिलें जे तुम्हा समागमें वल्लीखान व भाईखान् व घोरपडे वगैरे सरदारांस व भारी फौज व भारी सरंजाम् घेऊन पनाळात जाऊन सक्त लढाई करून । पनाळगड व शिवाजीसहीं हस्तगत करणें म्हणून लिहिलें । तें पत्र जोहरखानानें पाहुन अतित्वरेनें सेना व सरदार सरजामही शेखर करून घेऊन पणाळावरी उतरून गडास पांच महिने वेढा दिल्हा; तरिहिं शिवाजी राजानी चांगल भांडणें भांडत होते; शास्ताखान् अवरंगजेबाकडून निघाला तो चक्रावती प्रांती संग्रामदुर्ग वेढून भांडत होता। त्या संग्राम दुर्गातील शिवाजीराजाकडील ठणेंदार श स्ताखानास संव्हारिनासें चांगलें भांडणें देत होते । येणेंप्रमाणें शिवाजीराजे पांच महिन्यापासून पणाळगडात ....हारखाना व वेढ्यांत सांपडून युत्ध करीत अस्तां राजमाता जिजाई आऊसाहेब प्रतापगडावरी थोडे दिवस असून तदनंतरें परतून पावले होते, ते जिजाई आऊसाहेब प्रस्तुत राजे हीं वेढ्यांत सांपडलें, तेथे ही संग्रामगड चक्रावती शास्ताखानानी वेढिला, तेव्हां जिजाई आऊसाहेबास शिवाजी राजास पाहावें म्हणून तेव्हडा येक पुत्र अपल्यास आहे कोणा ....तीहीं त्यांना पाहावें म्हणावेंयाची अपेक्षा जाहली ।