ऊन केवळ आप्तकीनें बोलून भेटीचे संविधान सांगितलें । त्यास शिवाजीराजांनी अंगिकार करून ‘ फार उत्तम आमचे अपेक्षित कार्यच ...नानी सांगून पाठविलें ते फार उत्तम जाहलें । खान मजकूरानी या यवल्लीनगर जावळीचे मैदान येथील राण व येथील गड हे कांहीं ....हिले नाहींत कीं येथेंच आलिया भेटे गोष्टी यथास्थित होती ' ह्मणून सांगून पाठविलें । ते वर्तमान कृष्णाजीपंत वकीलानें येऊन सांगतांच ....न मजकूर बहुत संतोष पाऊन फौज कुच करून चालिले । तेव्हां .....रोबरीचे वरकड वजीरानीं त्यास्थला जाता नये, शिवाजीराजा सामान्य ....व्हे, कांहीं कपट करील' म्हणऊन उंदडारीतीनें सांगितलें व अपशकु...ही फार जाहले । कोणतहीं मानिनासें लोहपर्वताचे उत्तारांत जावळीच वनदुर्गास बाहेर उतरून राजास सांगून पाठविलें । तेव्हां राजानीं वाटावेटा समग्र बांधून, पलीकडीलें मनुष्य घाटांत येऊं देईनासे, घाटा तमाम झाडे तोडून खान मजकुराचे लोकांस आपण आली वाट देखील आपणास कळेनासे करून, आपलें गडे दुर्गे किल्ले समग्र मजबूद करून ....ने प्रांताकडील व हली नवी संपादिल्या मुलुकांतहीं त्या त्या ठाणेदारांस ‘आपण संकेताचा नगारा वाजवितांच तो शब्द अैकिल्याक्षणी चहुंकडील फौज खवळून अफजलखानाकडील येक मानव देखील सोडिनासे मारून टाकणे' ह्मणून ताकीद करून आपण जावळीच वनदुर्गांआतीला मैदानात सदर करून खान मजकुरास भेटीस बलाऊन पाठविलें । अैश समंई शिवाजी राजास वर्तमान आलेजे, ‘अफजलखान विजापूर सोडून येते वाटेस नवी मुलुकें अह्मी बांधिला तो बांधीत व लुटे करीत येणें प्रमाणें येत असतां, तुमचे ज्येष्ट बंधूसंभाजीराजे कांहीं फौज घेऊन युद्धास गेले त्यांस घेरून कालहा आधी देऊन कृत्रमें करून मारून टाकिले । ते वर्तमान शाहाजीराजास कळून त्यांचें उत्तरकार्य जाहल्यानंतरें त्याच व्यसनानें थोडे दिवस असून शहाजी राजे हीं परमपदास पावले । त्याचा दिवस शक १५८० विकारी संवत्सरी संभाजीराजे दैव गतीस पावले ।