सांगून, आपण संकेत कडून बाजवावेंयाचा जिनसही त्यांस कळऊन ये आपण जावळी जाऊन पावले । उपरी अफजलखान परामर्श केल्यांत, शिवाजीराजे जावळीस पावले ह्मणावयाचें कळून, पंढरपूरचे मार्गाने जाणार वाटेनें न जातां विठोबाचे मूर्तीस उपद्रव करावयाची योचना केली । त्यास विठा अप्रत्बा होऊन त्या वेळेस मूर्ती दृष्टीस पडेनासी। झाली । त्या उपरि तुळजापुरास पाऊन तुलजाभवानीचे मूर्तीसही उपद्रव मांडिला तिथेंही मूर्ती अप्रत्यक्ष जाहली । तेथून निघून शंभूमहादेवास । येऊन उपद्रव आरंभिला तो बराबरी साहा वजीर मराठे होते । तेही आडवे येऊन अटकाविले । त्यामुळें तेथून निघून पल्लीवन ह्मणावयाचे पालीचे गडास आला । तेथेहीं देवानें कांहीं चमत्कार दृष्टांत दाखविल्या मुळें उपद्रव करिनासे । तेथेंच राहून कृष्णाजीपंत वकीलास भेटीचे संविधान बोलणें ह्मणून राजाचे नावें अफजलखानानें पत्र लिहिलें जे तुह्मी किती जाहल्यांहीं अल्लीयदल्शाहा बादशाहासी विरोधच केलां । तुमचे नातें तेसै नव्हें । तुमचे वडील शाहाजी राजानी केली वर्तणूक अैकिली असाल कीं । आतां तुह्मी बादशहा किल्ले येकंदर बांधिले; व बादशाही मनुसूपदारांस येकंदरांस मारून टाकिलां । बादशाहीं खजाने लुटला । रत्नासिंव्हासन येक करून त्या वरि बादशाहा होऊन बसतां । याखेरीज तुरुकाचे मतास निंदिता । जेथें तेथें मशीदा तोडितां । अैसा येकंदर द्वेष वाढवितां। करितांतुह्मी बादशाहीस गुनेगार जाहलां आहां।अल्लीयदल्शाहाचे चित्तांत तुह्मास उदंड रीतीनें कष्ट द्यावें ह्मणावयाचें वाटलें।त्यास शाहाजी राजाचा स्नेह ; करितां बादशाहास उडंद रीतीनें सांगून, तुह्मी बांधिल्या पैकी सिंव्हगड, भीमरथी, पुरंदरगड, जयवल्ली, येवढ सोडून देणे यथाप्रकारें तुमच्या देशांत तुह्मी सुखरूप असणें ह्मणून वारून घेऊन आलो आहो, करितां तुमची अमची भेट जाहल्यावरी वरकडेंही कळू येईल, म्हणून लिहून कृष्णाजीपंताकडे देऊन अणिखी कृष्णाजीपंतास कपटयुक्ती निरोपून शिवाजीराजाकडे पाठविलें । त्यानें राजापासी