Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ ९ ]                                                          राजश्री - साहेब                                                 

खबर- राजश्री- सेवेस निळो सोनदेउ व रखमाजी शिवदेऊ सेवेस बखर ++++ माहे जमादिलाखर साहेबाचे कृपादृष्टीकरुन वर्तमान कल्याण असे:-

 1केसो नारायण सबनीस किल्ले राजगड याची वर्तणूक पहिलेपासूनु पाहतां, कारभार माकूल नाहीं. ऐसीयासी, पहिलेच भलते गोष्टीचे तहकीक करावे तरी कितेक गोष्टीकरितां करितां येत नसे. त्याउपरि, साहेब राजगडीहूनु मिर्जा राजाचे भेटीस गेलियावर राजगडीं हवालदार नाहीं, अगर पद्यावतीस सरनोबत नाहीं. राजगडचा कारभार केसोपंताचे शिरीं आला त्यावरी आह्मीं बारीक नजरेनें पाहतां, राजगडचे तनखापैकीं लारी ३००० तीन हजार अबाजीपंताकडूनु व राघोपंताकडूनु आली. यासी केसोपंतीं तीन हजार लारीपैकीं लारी १४०० चौदाशें गोविंद राउताचे हवाला केली. आणि उरली लारी १६०० सोळाशें आपल्या हवालगिरापाशीं ठेविली. त्यावरी घालमेली करुनु या प्यादियापासून त्यापाशीं, त्यापासुनु आणिका प्यादियापाशीं, ऐसे दोघा चौघाजवळी देती. ऐसे पंधरा रोज घालमेली, करुन सोळाशें लारीपैकीं सोळाशे लारीपैकीं सासे लारी तोडाविली, आणि हजार लाहारी एका नाईकवाडियापाशीं ठेविली. यावरी आह्मांस घुणघुण कळो आली कीं, तीन हजार लारी आगी होती, यापैकीं चौदाशें लारी गोविंद राउताचे माहालीं दिधली आणि सोळाशें लाहारी काय केली तें कळत नाहीं. ऐसी खबर आह्मांस लागतांच, आह्मीं रखमाजीपंतास सांगितले कीं, तहशिलेस कोण गेले होते ते नाईकवाडियासी बोलावूनु आणणें. त्यावरी, रखमाजीपंतीं नाईकवाडियाचा नाईकवाडी बोलवूनु कोण तहशिलेस गेले होते, कोणापाशी काहीं पैके ठेविले आहेत कीं नाहींत, ऐसे मनास आणितां, त्यापासूनु त्यापासीं ऐसें करितां, प्यादे कोण्ही हजीर, कोण्ही मसालियासी गेले. खबर घेतां घेतां दादजी नाईकवाडी, गुंडा नाईकवाडी यापाशीं हजार लारी ठेविली ते आडळली. त्यास खबर घेतां व चौकशी करितां बहुत घालमेली केली. त्यावरी आह्मीं नाईकवाडियासी सांगितलें कीं, हजार लारी तुजपाशीं आहे ते आमचे बगररजा खर्च न करणें. ऐसें केलें तों प्यादियापाशीं तहकिकी केली. हे खबर केसो नारायणास कळली. *