Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३० ] श्री. १७३१.
राजश्री रघुनाथ देव याप्रति आज्ञा जेः -
तुह्मीं उभयतांसमागमें प्रेषिलें तें प्रविष्ट जालें. सकल अर्थ चित्तांत आणून समाधान पावलों. तरी याउपरि अविलंबेच आगमनार्थ होय तें करणें, यदर्थी तुमच्या शारदानी व मातु:श्रीनें लिहिलें असेल. आह्मांपासून तुमचें चालवायास तिळतुल्य अंतर होणार नाहीं. येविशी नारो दीक्षित व धोंडोंपंतीं लिहिलें आहे त्याप्रमाणें कार्य सिद्धीस पावणें. उभयतां आचार्य सांगतां कळों येईल. सर्व धंदा तुमचा आहे. हें पत्र सहस्त्र पत्रांचे ठायीं मानून सत्वर कार्यसिद्धी करणें. पुन: मागती उत्तर प्रत्युत्तरांचें प्रयोजन नाहीं. अस्मादिकांकडील एकच वचन की, निर्वाह केला त्यास अंतर नाहीं. हें पूर्ण चित्तीं धरून कांहीं मीनमेष न करितां आगमन करणें. आपण प्रयाण सत्वर करणें. बहुत काय लिहिणें. सुज्ञ असा.