Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
इ. स. १६२८ तली एक लेख
अज् दीवाणे रख्तखाने खास वजानेबू कारकुनानी व देशमुखानी प।। पुणें व मुकासाईयानी व हुदेदारानी अजहतदी मुकासाई हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे देऊळगौ नजदीक आलेगौ कर्याती पाटस प॥ मजकूर बिदानद. सु।। सन तिसा असर अलफ. दामोधरभट बिन नारायणभट व रामेश्वरभट बिन नारायनभट साकिन आरवी मुद्रल बंदगी हजरती माळून केले जे, आपणियासी इनाम जमीन सेत खुद खासा दोरी सवा दर सवाद मौजे देउळगौ नजदीक आलेगौ कर्याती पाटस परगणे मजकूर ब॥ हुज्जती हैबतखान सलाम अलफ आहे. येणेप्रमाणें फर्मान करूनु देणे म्हणोन. रोखा ममलकत मदारी मलक अंबर एकंदर इनामदारानी तिसा असर अलफ छ २० माहे सौवालु आहे. फर्मान म-हामती होये. मालूम जालें बा। ई आ। ती दिवाण खासा बराये ई रुके ७ देवविले. दामोधरभट बिन नारायनभट व रामेस्वरभट बिन नारायनभट साकिन आरवी मुद्रळ यांसीं इनाम जमीन सेत खुद खासा दोरी सवा दर सवाद मौजे देउळगौ ना आलेगौ कर्याती पाटस पा। मजकूर बा। हुज्जती हैबतखान सलास अलफ दिधले आहे, तेणेप्रमाणें करार केले असे. ता। सबा असर अलफ जैसा भोगवटा व तसरुफाती चालत असेल तेणेप्रमाणें दुमाला कीजे. दर हर साल फर्मानाचा उजूर न कीजे. तालीक घेऊन असली फिराऊन दीजे. वा रोखा मा। मा। मलक अंबर एकंदर इनामदारानी तिसा असर अलफ छ २० सौवालू प्रा। दामोदरभट व रामेस्वरभट सेत दोरी बा। सवाद दफ्तर यास मोर्तब सूद. १।
रुजू सूद. रुजू मुजमू. रुजू सुरनवीस.
तेरीख २७ माहे सफर समान इसरैन अलफ.
पा। हुजूर.
सप्रसूद | सप्रसूद | सप्रसूद | सप्रसूद | सप्रसूद |
मुश्रीफ | दफ्तरदार | मजमू | न्याबती | सूरनिवीस |
बारसूद | बारसूद | बारसूद | बारसूद | बारसूद |
तालीकसूद | तालीकसूद | तालीकसूद | तालीकसूद |
हा लेख अहमदनगरच्या निजामशाहींतल्या शहाजी भोसल्यांच्या राजोपाध्यांना इनाम दिल्यासंबंधाचा आहे, व तो साता-यांतील भाऊसाहेब राजोपाध्ये ह्यांच्या, दफ्तरांतील आहे. हा दोन भाषांत लिहिला आहे. प्रथम सर्व मजकूर फारशी व नंतर त्याच्या खालीं तोच मजकूर भाषांतर करून मराठींत दिला आहे. मराठी मजकुरांची लिपी मोडी आहे. हा मराठी मजकूर जशाचा तसाच वर दिला आहे. हें मराठी सध्यांच्या महाराष्ट्रांतील कोणा फारशी न जाणणा-याला समजेल असें वाटत नाहीं. तरी इ. स. १६२८ त हें मराठी महाराष्ट्रांत सरकारदरबार करणा-या लोकांना समजत असे असें दिसतें. ह्या लेखांत एकंदर २३६ शब्द आहेत. पैंकीं विशेषनामें सोडून दिलीं असतां, फक्त ३४ शब्द मराठी आहेत, व तेहि प्रायः तदर्थवाचक फारशी शब्दाचें भाषांतर आहेत.
आतां ह्या इ. स. १६२८ तील लेखाशीं तुलना करावयास इ. स. १७२८ च्या सुमाराचा एक लेख देतों.