[ १९१ ] श्री. १७७४.
विशेष आपणापासून बावड्याच्या सस्थानचा अभिलाषास्तव शेणवी याणीं फितुर करून आह्मास आणून, तीर्थस्वरूप राजश्री सुबराव पंडित अमात्य यासी व आह्मासी खटला करून, त्यासी बाहिर आठ वर्षे परागदा करून, शिबदीच्या पेचांत आणून, संस्थान श्रीमंत महाराजानीं हस्तगत करून, आह्मास कैद करून आणिले वडिलावर कृपा करून त्याचें सस्थान त्यांचे स्वाधीन केलें उपरात वडील आह्मावर कृपा करून सोडवून घेऊन साता-यास लावून दिल्हें पेशजी सदाशिवभट नानल याचे विद्यमानें आपले कानावर संस्थानविशीं व कर्जाविशीं नाना प्रकाचे खटले बोलणेत आले असतील ते आह्मी आपले स्वसंतोषे सोडून वडिलाकडे आलोच कर्जाचे व गाव खेडचे व चीजवस्तीचे व सस्शानविशीं गुता आमचा त्रिवर्गाचा व मातु श्रीचा व आमच्या वशाचा तीर्थस्वरूप राजश्री सुबराव पडित अमात्य व त्यांचे संस्थानचा गुता व खटला आमचा नाहीं पेशजीच समाजावणी आपण त्याजविशीं आमचे खटलेमुळे आपण त्याजवर अरज नसावी, आमचेह व त्याचें खटलें माहाराज यांचे सनिध तुटलें अत पर किमपि आमचा व त्यांचे संस्थानविषयीचा गुंता आह्माकडे नाहीं व त्याजकडे आमचा गुंता किमपि तिलप्राय राहिला नाहीं आपण आमचे कारभारी व आणखी घरांतील कोणी दरजा आपणास समजावून वडील ---
अपूर्ण.