[ १८९ ] श्री. १ मार्च १७७४.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री बाळाजी गणेश यासीः -
प्रति मातुःश्री गंगाबाई आशीर्वाद अर्बा सबैन मया व अलफ. ता। साळसी येथें राजश्री सुबराव पडित अमात्य याजकडे दीड तक्षीम वगैरे अंमल पेशजीपासून आहे त्यास सालमजकुरीं मालवणकरी याणीं कजिया करून अमल उठविला आहे ह्मणोन हुजूर विदित जाहले त्याजवरून हें पत्र तुह्मास सादर केले असे तरी सरकार अमल अलीकडे पडित मशारनिलेकडील ता। मजकुरी चालत असेल त्याप्रमाणें चालवणें मालवणकरी नवीन कजिया करीत असल्यास करून देणें सुदामत चालत असेल त्याजप्रमाणें चालवणे तुह्मी आपले तर्फेने हरएकविसीं साहित्य करीत जाणें. जाणिजे छ १७ जिल्हेज. आज्ञा प्रमाण.
लेखनसीमा.