[ १८८ ] श्री.
पौ। छ १० जिल्हेज.
श्रीमंत राजश्री सुबराव पडित स्वामीचे सेवेसीः-
पो। बाळाजी जनार्दन कृतानेक साष्टांग नमस्कार विनति येथील वर्तमान ता। छ १९ जिलकाद पावेतों यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. राजमंडलाकडील तह राजश्री परशुरामपंत यांचे विद्यमाने होत आहे, याजकरितां त्यास लिहून पाठवून आपलेकडील
बंदोबस्त पूर्ववतप्रमाणें होय तें करावें, येविशी राजश्री गमाजीपत सूचना करितील ते मनन करावें, ह्मणोन विस्तारें लिहिलें, व गमाजीपंतांनीं सांगितलें, त्याजवरून कळो आलें ऐसियास, येविशी परशुरापंत यांस अलाहिदा सरकारचें
पत्र पाठविलें आहे ते आपणाकडील बंदोबस्त करून देतील. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे हे विनंति.