[ १८४ ] श्रीराजाराम. १७५१.
माहाराजाचे सेवेसी विज्ञापना. उपरि आह्मीं ब्राह्मण कैलासवासी थोरले माहाराज यांचे नवाजीस. आजे बाप याचें उर्जित केलें हुद्दा, मामला, कैद, कानू, सरंजाम देऊन चालविलें. अर्ज विनति चालवीत आले आह्मास मातु श्री आईसाहेबीं वाढविलें, नांवारूपास आणिलें चाकरी घेतली. शेवटीं राज्यांतील विचार पाहोन वनवास करीत राहिलों साहेबाचा जन्म झाला तेसमयी मातु श्रीच्या आज्ञेप्रमाणें दोघातिघांनीं जिवावर होडखे केला साहेबास पळविलें ते बावडियासी नेलें तेथे आह्मीं मागावून गेलो साहेबांचें पालणपोषण केले दहा बारा वर्षे जाली. तेथे आह्मावरी राजा शभूची इतराजी झाली सौ जिजाबाईसाहेब चालोन आली तेसमयी परदेशी घासीराम याणे व बाइकोनें आह्मास नकळत पळवून साहेबास घाटाखाली नेलें तेथून चौ-यायशीचे फेरे फिरत, घिरट्या घेत श्रीतुळजापुरास गेले तेथें थाग आह्मास लागला नारोजीबाबा आधारी यांचा सहवास जाला तेथे रहाणें जालें श्रीतुकाईने दया केली, ते समयी साहेब पाणगावास आले. बाईचा सहवास जाला. मुलकात पुकारा होऊन राजा शाहूपर्यंत चहूकडे नाव गाजलें यामुळे आह्मीं बावडियाहून श्रीपंढरीचे यात्रेस आलों. साहेबाकडे पत्र लेहून मातु.श्रीचे आज्ञेप्रमाणें भुजंग हुजरे व राजश्री एस ठाकूर व बहीरजी पडवल व एसू वस्त्रे देऊन पाठविले. साहेबीं इमान वचन दिल्हे, पत्रें पाठविलीं दर्याबाई यांसी वस्त्रे व पत्रे पाठविलीं. तेथील बोलीचाली अवघी एकीकडेस राहून नवाच पंथ अविद्या चित्तीं धरून मातु श्रीची सोय व आमची सोय टाकून ज्यांणीं जें सांगितलें तेंच ऐकावेसें जालें साहेबामुळें मातु श्रीनीं उपभोगिलें, आह्मीं श्रम साहस करून उपभोगिले, ते एकीकडेस राहिलें , तें ईश्वर जाणें ! साहेबाकरितां ऊर्जितास्तव श्रीदेवाजवळ अनुठानें केलीं, ब्राह्मण घातले, नवस केले, त्याची यादी अलाहिदा लिहिली आहे राजा शाहूचा अवतार संपूर्ण जाल्यास कोणी खावंद नाही, ऐसें जालें. तेसमयीं मातु श्री आईसाहेबीं अवमान धरून साहेबास आणविलें. माता लेकराजवळ धावली. ऐसें असोन साहेबीं मायीचा जिव्हाळा सोडिला. मुंज, लग्न मातु श्रीमुळें साहेबाचें जालें स्थापना आईसाहेबामुळे राज्यपदावरी जाली ती एकीकडे राहून साहेब दुसरियाचे मायेस गुंतले धनलोभास मोहो पावले. मातु.श्रीची उपेक्षा केली ही ईश्वरास न मानें. येणेकरून राज्यास अपाय आहे एक वर्ष साहेबास राज्यपदावरी बसोन जालें साहेबाचें धणीपण चाकरलोकीं बाकीस ठेविलें नाहीं. धकाबुकी जाल्या. शिवनिर्माल्य करून ठेविले हुजरेयांसी मारिलें ये गोष्टीची ईरे अभिमान सोडून आपला हेका तिरपगडा खरा! मातु श्री नलगेत ! ऐसा मोहो घालून, दुष्टांनीं कपटविद्या करून मातापुत्रास अंतर पाडिले हें आमच्या चित्तास येत नाही माता पुत्र, गुरु चेला, धणी चाकर, ही मर्यादा चालावी ; साहेबीं उत्तम वासना धरावी ; वडिालांचे आज्ञेप्रमाणें कारभार करावा ; हें उत्तम आहे राजा शंभू कोल्हापुराहून दुष्टांनीं वारणे ऐलीकडेस दहा राउतानिशीं आणिले. ते सातारियाचे शहरात येऊन, घरोघर हिंडोन, साहेबाचे अदुष्टाचे बाल्याबोला माघारे घालविलें चोर एकीकडेस राहून संन्यासी मोठा पाहोन सुळीं दिल्हा, ऐसी गत जाली राज्यांत डोहाणा फितूर आला. चोहूकडे गर्दी जाली गड, किल्ले गेले दुष्ट बळावले ये गोष्टीची ईरे अभिमान साहेबास नाही. हें दुख कोणाजवळ सागावें. आह्मांस गवत, फाटें, पाणी पाने तुमच्या राज्यात मिळत नाही कर्जदार जालों लोकांची घरे बुडविलीं शिराळें, सातारा येथे येऊन फजित पावलो साहेबाजवळ अर्ज केला तो चालत नाही चोर, चहाड, लबाड याचा पर्वकाळ, इतबार साहेबास वाटतो आमचा विश्वास इतबार नाहीं.