[ १८३ ] श्री. १७४८.
विनंति उपरि येथें वर्तमान ऐकतो जेः-
पाणगांवमधें राजा असे. तो निघोन सप्तऋषीस येत असे त्यास हें वर्तमान आपल्यास विदित आहे कीं नाहीं हें कळत नाहीं. कोणत्या विचारें येतात हें कळत नाहीं यावें, यामधें उत्तम नाहीं. सौभाग्यवती मातु श्री सकवरबाईचा मजकूर तर आपल्यास विदितच असे त्याचें मानस एक प्रकार असे. ती चिंतितात जे - एक वेळ आपले हातीं यावा, मग ईश्वर असे. महाराजाच्या चित्तांतील शोध घ्यावा, तर तूर्त समाधान नाहीं. यास्तव धनीन जवळ असे बोलता येत नाहीं. बरे जाहलेवर चित्तातील शोध करून लिहून पाठवितों. तंवर उतावळी करून आणाल तर न आणणें. येथें आलेवर परिणाम बरा नाहीं. तुह्मी सुखरूप राहणें, राजश्री बरे जाहलेवर आह्मीं निरोप घेऊन येतों. मग आपले चित्तामधें जावयाचे असेल तर निरोप देऊ परंतु तुह्मीं तूर्त आहे ऐसाच असो देणें. तुह्मीं तेथेच राहणें खर्चावेचाविषयी राजश्री जानोजी पवार यांस लिहिलें असे ते देतील. सकल वर्तमान शिवाजीपंत लिहितील. सेकू सागतां विदित होईल. बहुत काय लिहिणें हे विनंति पत्र फाडून टाकावे.