[ १६५ ] श्री.
° ˜
श्रीशंभूराजचरणीं तत्पर
दत्ताजीसुत येसोजी नलगे
निरतर.
राजश्री पंत अमात्य स्वामीचे सेवेसीः- श्रीमच सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नेll येसोजी नलगे नामजाद व कारकून किल्ले पावनगड दंडवत व अनुक्रमें सा। नमस्कार विनंति येथील क्षेम जाणोन स्वकीय लेखन करावया आज्ञा केली पाहिजे विशेष. सरजकातीचे व मौजे पुसेरे येथील दिवाणच्या सनदा पाठविल्या त्यावरून गांवचें व सरजकातीचें ताकीदपत्र पाठविणें ह्मणून लिहिलें त्यावरून सरजकातीस व मौजे पुसेरे ता। बोरगाव यास ताकीदरोखे पाठविले आहेत. तरी सनद पैवस्तापासून ऐवज जो होईल तोच घेणें ह्मणून आपणाकडील कमाविसदारांस ताकीद करून गावांस व सरजकातीस पाठविले पाहिजे लटकाच कजिया कमाविसदार करितील त्यास ताकीद करून पाठविले पाहिजे बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे हे विनति.
मोर्तबसूद.