[ १३९ ] श्रीविठ्ठल.
° श्री ˜
सामंतकुलेशोभानु-
र्मागलाख्यमहेश्वर:।
श्रीनागसामंतमुद्रेयं
जनभूत्यै विराजते।।
राजश्री पंत अमात्य हुकमतपन्हा गोसावी यांसीः -- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।।
नाग सावत भोसले सरदेसाई प्रां । कुडाळ व महालानिहाय रामराम विनति येथील कुशल जाणून स्वकीयानद लिहित असलें पाहिजे. विशेष बहुत दिवस क्रमोन पत्र पाठविलें आढरे परसोन श्रवणे चित्त सतोषाते पावून समाधान वाटलें याचप्रमाणे प्रतिक्षणी साकल्य वृत्त लिहून सतोषाभिवृद्धि केली पाहिजे. यानतर महाराज राजश्री स्वामींनी उभयताकडील सौरस्याचा मजकूर लिहिला. अक्षरशा श्रुत जाहाला त्या कर्तव्यें एकसा विचारें जे आपणाकडील विवेक होऊन आला नाही हेच आह्मास अयुक्त वाटलें . बरें । आपण राज्यभारी, कर्ते असा तोही प्रसंग आपले चित्तानुरूप होऊन येईल. ते गोष्टीचे अगाध काय असे ? रा संभाजी आंगरे यांची व आपली भेटी जाहाली. बोली चाली व्हावी ते पूर्वी सुचविलेप्रमाणें जाहाली असली तर बहुत उत्तम गोष्ट घडली. जो विचार आमचे चित्ती आवश्यक होता तो संपादिला ते युक्तच गोष्ट केली बोलीचा मजकूर तरी - आपण सुज्ञ लोक आहा, तेथे सांगणें अगर लिहिणेंसे काय आहे ? मुख्य गोष्ट जे, उभय पक्षी, विवेक जाहाला. तेव्हा सर्वही मामला उत्तमच होऊन येईल. इलाचीबेग यांकडील काय वर्तमान लिहावें ह्मणून लिहिलें. तर निजामनमुलकाकडून बेळगाऊंचे किलेबारीस फौजदार होऊन जागा येऊन दाखल जाहाले. आह्मासही स्नेहभावयुक्त येताच पत्रें आलीं होती. चातुर्मास क्रमलेनंतर त्यांची कितेक मनसबे करायाची उमेद आहे. अगोदर फौजेचीही तरतूद करीत आहेत मालवणकर याकडील विचार लि।। त्यास त्या ह्मामध्यें कटकट माडिली आहे किल्लेस रा। शिवाजीपंत कारकून मख्तसर आहेत त्यांचीं आह्मांस पत्रें आलीं कीं, तुह्मीं आह्मीं मिळून मनसबा करावा, प्रस्तुत जमाऊ पाठवणे ह्मणून लि।। त्यावरून तेथें जमाऊ पाठविला आहे हमेशा स्वारी शिकारी करून पायबंद लागला आहे महादाजी अनंताचा मजकूर लि ।।. बरें । त्यांचें अगत्य कोणतें आहे ? उभय पक्षी भेटी होतील तेव्हां त्याचेही पारपत्य केले जाईल भेटीचे प्रसगाबद्दल अगोदर भाद्रपदमासी रा। माद पाध्ये यास पाठवितो असें लि।। बहुत बरें । सर्वही एकीकडेस ठेऊन आधीं भेटी व्हावी हाच इत्यर्थ आहे एतद्विषयी दुसरा विचार किमपि नाही भाद्रपदमासीं त्यास आधीं पाठवावें. तैसेच आपलं भेटीचा लाभ होऊन पुढील कर्तव्यता जे करणें ते आपले विचारें केली जाईल प्रस्तुत धुळाजी यास पाठविले. सांगता कळो येईल मागून भला मनुष्य पाठवितों आपले विचारास येईल तरी समागमें मजुरा देऊन पुढें आगरेकडे रवाना करावे मुख्य गोष्ट आपली भेटी व्हावी हा हेत आमच्या चित्ती भेटी होऊन येई तेव्हां मनाची निशा होऊन स्वस्थता दिसेल. बहुत काय लिहावें विनति.
विलसती
लेखनावधि.