[ १२५ ] श्री. २ मे १७३१.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५७ विरोधकृत नाम संवत्सरे वैशाखे शु ।। सप्तमी रविवासरे क्षत्रियकुलावंतस श्री राजा शंभूछत्रपति स्वामी यांणी देशमुख व देशपांडे ता। तारळे यासी आज्ञा केली ऐसी जेः ---
˜ श्री ° श्री आई
राजाशभुछत्र- आदिपुरुष श्री
पतिहर्षनिदान । राजाशिवछत्र-
त्र्यंबकसुत केशव- पतिस्वामिकृ-
राव मुख्य प्रधान.. पानिधी।। तस्य
परशुराम त्र्यंब-
क प्रतिनिधी.
राजश्री शिवाजी शकर गोत्र शांडिल्य उपनाम गुपचुप हे स्वामीच्या राज्यातील पुरातन एकनिष्ठ सेवक यासी पूर्वी अरळगुंडी ता। कापसी हा गांव इनाम दिल्हा होता. तो दूर करून हालीं त्याचा मुबादला मौजे आंवळी बु ।। ता। मजकूर हा गांव पेशजीच्या मुकासियाकडून दूर करून यासी इनाम कुलबाब कुलकानू हालीपट्टी व पेस्तर पट्टी जलतरूतृणपाषाणनिधिनिक्षेपसहित, खेरीज हकदार व इनामदार, देह १ एक रास इनाम आजरामरहामत करून दिल्हा असे तरी तुह्मीं पूर्वमर्यादेप्रमाणें यांचे स्वाधीन करणे प्रतिवर्षी नवीन पत्राचा उजूर न करणें आणि मौजेमजकूर यांसी यांचे पुत्रपौत्रादि वंशपरपरेने इनाम सुरळीत चालवणें या पत्राची प्रती लेहून घेऊन अस्सल पत्र याजवळ भोगवटियासी परतोन देणे निदेश समक्ष.
मर्यादय
विराजते
रुजू समस्त
मंत्री.