[ १२० ] श्री.
छत्रपति
राजश्री चिटकोवा गोसावी यांसीः -
अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। गुंजाजी गाईकवाड सरखवास रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष तुह्मीं पत्र पा। तें पावोन लिहिला मजकूर कळो आला. वो। राजश्री केशवभट्ट गोटखिडीकर याचा मजकूर लिहिला तो कळला. ऐसियासी येविशीं श्रीमन्ममहाराज राजश्री स्वामीचे सेवेसी अर्ज करून आज्ञा होईल त्याप्रो। मागाहून लिहिलें जाईल. बावडेस रवाना करणेचे लाखोटे दोन पा। आहेत. येऊन पोहोंचतील. बहुत काय लिहिणें. हे विनंति.