[ १०५ ] श्री. १८ डिसेंबर १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलकनाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल चतुर्दशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांसीं आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं बावडियाहून उत्तरेकडेस स्वार होऊन गेला. तेव्हां स्वामीस विनंतिपत्र पाठविलें कीं, चिरंजीव राजश्री आप्पाजीराव स्वामिसन्निध आहेत, साहेबीं हुद्दा मामला सांगोन उर्जित करावें, वडिलीं या राज्यांत सेवा चाकरी केली आहे. ऐसे कितेक विशदें लिहिलें. ऐशास, तुह्मीं परपक्ष अवलंब करून गेला. आपाजीराव स्वामीसंनिध राहिले. याकरितां मजमूचा हुद्दा व जिल्हा मामला पूर्ववत्प्रमाणें त्यास सांगोन जंजिरे रत्नागिरीस रवाना केलें जंजि-याचा नातवानीचा प्रसंग त्यामध्यें राजश्री कान्होजी आंगरे सरखेल यांचा शह लोकांस भक्षावयास नाहीं. तेव्हां स्वामीनीं यांसी जिल्हे, मामले, गाव, खेडीं यांचा ऐवज बेगमी करून याणीं कर्जवाम करून ऐवज दिला. स्थळ रक्षण केलें. ऐसें असतां तुह्मीं रासिवडे, सांगरुळचा मोबदला ह्मणून पोंबुर्लेवर रोखा करून दीडशें रुपये घेतले. याकरितां त्याणी चिदरत्रिंबकावरी गोवदलियाचा रोखा केला मात्र निमित्य ठेवून तुह्मी मो+ स केली व नंदगांव व नाडगौडी ता। तारळें येथे रोखे केले, कीं मौजे मजकूरचा ऐवज दुसरियाकडे एकदर वसूल न देणें, ह्मणून वरातदारास सांगोन धुंध केली यामुळें गांव परागंदा जाहले ऐशास, स्वामीचे आज्ञेप्रमाणें याणीं खेडियांचा वसुल थोडाबहुत घेतला असता तुह्मी येविषयीचा कथळा करार करावा ऐसें नाही. आपाजीराव यासी स्वामीनीं लिहिलें आहे याउपरी तुमचे खेडियांवरी रोखे करणार नाहीं. व तुह्मी यांच्या खेडियांवरी व नाडगौडीवर केलें तें मना करणें. आपाजीरायाकडील खासगत गांवपैकी जो ऐवज घेतला असेल तो परतोन देणें. या कामास नारोराव हरकारे पाठविले आहेत बहुत लिहिणे तर तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.