[ ५४ ] अलीफ. ११ मे १७०७.
सर्व राजात श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, मुसलमानी धर्मरक्षक, राजे शाहू याणीं बादशाही सरकारास संतोष मानून समजावें कीं, महंमद अजीम मारिला जाऊन इकडील फत्ते झाल्यानंतर काय मा। झाले ते लिहिण्यांत येत आहे कीं, खुजस्ते बखतर याचें दैव फिरल्यामुळें त्याणें आपले कामगारांचे सांगणें ऐकून इकडील लोभावर लक्ष न ठेवितां लढाईस आला होता. तो छ १० सफर रोज सोमवारीं आपले पुत्रासुद्धां मारला गेला व कितेक लोक कांहीं कामास आले ऐशियास तुह्मीं या गोष्टीचा संतोष मानून अशी ताकीद ठेवावी कीं, तुमचे फौजे पै।। कोणी पादशाही मुलखांत पैगामा करुं नये आणि रयतेस इनाम देऊन हे सर्वकाळ इकडील लोभास आपले उद्योगाचे कारण समजत जावें. छ १९ सफर, सन १ जुलूस.