[ ५२ ] श्री. १७००.
यादी चंदीच्या मुकामाहून धर्मादाय व इनामती व इसाफती व नूतन वतनें कारकीर्द महाराज राजश्री छत्रपति साहेबानी दिलीं होती त्याचा विचार मनास आणितां राज्याचा बंदोबस्त न होता ऐश्या सनदा येऊन दाखल जाहाल्या तेसमयीं श्रीमन्महाराज मातुश्री तारा आईसाहेब व सर्व राजमंडळ मिळोन निर्णय केला. येणेप्रमाणें, बितपशील सु।। इहिदे अलफ.
ज्यांणी शंभर लारीची सनद घेतली असेल, त्याप्रमाणें निमेप्रमाणें द्यावे. कलम १.
फरमान पातशाहाकडे प्रात असतां फरमान दिलें नाहींत. कलम १.
सनदा आणिल्या त्याचा प्रकार. ज्यास प्रांतांत फरमान भोगवटियासी दाखवूं लागले तेव्हां दरखोरी करितां फरमानाचा निवाडा येणें प्रमाणें-
महाल
१ खारापाटण महाल.
१ संवदळ महाल
१ राजापूर महाल.
१ लांझे महाल.
१ संगमेश्वर महाल
१ साळसी महाल.
६
येकूण महाल सहा. या महालांतील अंमल अदिलशाहा पातशाहा याचा उठून गेला ते समयीं इकडील लोक तिकडेस चाकरीस होते. ते समयीं आपले घरास यावयास लागले. तैनाता पावल्या नाहींत. त्यावेळेस एकंदर लोकांनी आदिवशहास अर्ज केला कीं, आह्मी आपल्या प्रांतास जातो, आह्मांस पैका पावला नाहीं. पुढे आह्मीं काय करावें ? आपलीं ठाणीं उठोन आलीं त्या प्रांतीं साहेबाचा नक्षा राहे ऐसें द्यावें. तेव्हा ज्यास जे गोष्टींचे अगत्य त्याप्रमाणें फरमान मागितलें त्याप्रमाणे दिलें. फरमानाचा कर हातास येणेचा. मुनसीस सांगावे कीं, फरमान अमुक कार्यास पाहिजे त्याप्रमाणे मुनसीनें अर्जबेगास सांगावें कीं, फलाणा गृहस्थ फलाण्या कार्यास फरमान मागतो. अर्जबेगाने आदिलशहा पाछाहास अर्ज करावा कीं, अमुक जमादार आपले घरी जात आहे, पैका पावला नाहीं, आणि साहेबाचीं ठाणीं प्रांतांतील उठोन आलीं, पैका न दिलें याकरिता अफाट शिरपाव मागतात, साहेबीं द्यावें, ह्मणजे प्रांतांत साहेबाचा नक्षा राहील. हें जाणून सर्वांस मागितलेंप्रमाणें फरमान देविलें. फरमानाचा चक लहान कार्य असल्यास येणेप्रमाणें. सिरस्ता-
मुनसी अर्जबेग नगर
२ २ ५.