[ ४५ ] श्री. ४ ऑगस्ट १६९३.
० ˜
श्रीमच्छत्रपते शंभो
शासन शासत. सदा।
अनंतसूनो रामस्य चिरं
मुद्रा विराजते।।
अज् सरसुभा राजश्री रामाजी अनंत सरसुभेदार व कारकून सुभा प्रा। राजापूर ताहा कमावीसदार व कुळकर्णी व गांवकर व रयानीं मौजे त्रिंबक ता। साळशी सुहुरसन अर्बा तिसैन व अलफ. राजश्री छत्रपति स्वामीचें आज्ञापत्र, छ २९ साबान, पौ। छ २२ जिल्हेज, सादर जाहालें. तेथें आज्ञा कीं - ता। साळशी या माहालीची सरदेशमुखी पूर्वी अदलशाहानें जानतराव यासी वतन दिल्हें होतें परतु भोगवटा जाहाला नाहीं. वतन दिवाणांत अमानतच आहे हें वतन राजश्री रामचंद्र नीलकठ यास अजराम-हामत वतन करून दिल्हें असे. साळशी महालीच्या सरदेशमुखीचें वतन यांचे सांभाळीं करून यांस हक्कलवाजिमा इनाम मौजे चिदर व मौजे त्रिंबक देह २ दोन कुलबाब कुलकान् चालवावयाची आज्ञा केली असे. तरी येणेप्रा। हक्कलाजिमा इनाम यांस यांचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें चालवणें. ह्मणून आज्ञा त्यावरून मानिलेस ता। मा। रची सरदेशमुखी वतन स्वाधीन करून वतनास हक्कलवाजिमा व इनाम चिदर व मौजे त्रिंबक उबळ केलें आहे. तरी सदर्हू सरदेशमुखीच्या कार्यभागास मा। नुयाबी रा। अंताजी जनार्दन यास मुतालिकी देऊन पाठविले आहेत. याचे आज्ञेंत राहोन मौजे मजकूरचा वसूलवासूल कुलबाब कुलकानू समवेत मा। निलेकडे देत जाणे. छ २२ जिल्हेज मोर्तब सूद.
विलसति
लेखनावधि
मुद्रा.