[ ४३ ] श्री. १३ मे १६९२.
श्री नृहरिप्रीत्या मुद्रा नीराजि
जन्मन ll राजरामप्रतिनिधे. प्रल्हादस्य
विराजते
० ˜
श्री राजाराम नरपति
हर्षनिदान ll मोरेश्वरसुत
नीळकंठ मुख्य प्रधान
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८, अंगिरा नाम संवस्तर, ज्येष्ठ शु ।। सप्तमी, गुरुवासर, क्षत्रियकुलावंतस श्री राजाराम छत्रपति यांणीं जाऊळकर व दरेकर व मावळे लोकानी व कासुर्डे व गोळे व समस्त लोकानी पदाती यांसीं आज्ञा केली ऐसी जे - पूर्वी केलासवासी स्वामीचे वेळेस तुह्मीं लोकीं कष्ट मेहनत करून थोर थोर कामे करून दिल्हीं आहेत. सांप्रत रायगड हस्तगत करून घेणें हें कार्य बहुतच थोर आहे. येविसीं राजश्री रामचंद्र पडित अमात्य यांणीं तुह्मास सागितलें आहे, त्यावरून तुम्हीं गड हस्तगत करून घ्यावयाच्या यत्नांत आहा. साप्रत स्वामीनी राजश्री आबाजी सोनदेव यांसीं पाठविले आहे रायगड हस्तगत करून घ्यावयाची आज्ञा त्यास केली आहे हे जाऊन राजकारण जें करावयाचें तसे करितील तरी तुह्मी कुल लोक अनुकूल होऊन रायगडाची हरी करणे सक्ती करून ते स्थळ हस्तगत करून फतेचें वर्तमान स्वामीस लिहिणें. ह्मणजे स्वामी तुमचें विशेष ऊर्जित करितील तुह्मांस देण्याघेण्याचा तहरह जो करणें तो मशारनिले करितील. त्यास गड हस्तगत झाला ह्मणजे स्वामी तेणेचप्रमाणें चालवितील आपले दिलासे असों देऊन एवढे कार्य अविलबेकरून स्वामीस संतोषी करणेविसी राजश्री रामचंद्रपंतास लिहिले आहे. तेही जे बेगमी करावयाची ती करितील. जाणिजे. निदेश समक्ष
मयादेयं
विराजते
रुजू
सुरु सुद बार.