[ ३४ ] श्री. २६ जुलै १६७७.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ४ पिंगल संवत्सरे श्रावण शुद्ध ७ सप्तमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति यांणीं यशवतराऊ शाहाजी कदम नामजाद कोट वालगुडानूर यासी आज्ञा केली ऐसी जे --- कोट मजकुरी हसमे नामजाद आहे व एक जिन्नसही शिल्लक थोडाबहुत आहे ऐसियासी, त्याच्या लिहिणियासी लिहिणार पाहिजे ह्मणून. त्यावरी तिमाजी नारायण यासी जमा करून पाठविले आहे तैनात दरमाहे होन प्रा । ३ तीन रास केले असेत इ ।। प्रो । पासून वजावाटा उरवेसीप्रो । वजा करून बाकी बेरीज माहे दर माहे आदा करीत जाणे, आणि त्याचें हातें कूटमजकुरीं लिहिणियाचे काम घेत जाणे कागद बाब लिहिणियामाफक देत जाणे. मजुरा असे लेखनसीमा.
श्रीशिवचरणीं मर्यादेय
तत्पर त्र्यंबकसुत विराजते
मोरेश्वर.