[ ३२ ] श्री. ३१ मे १६७५.
मा। अनाम शामजी आवजी हवालदार व कारकून तर्फ जाळगाऊ मालून दानद सु ।। सति सबैन अलफ. सूर्याजी दुंदुसकर, जुमला हसम पावलोक, वस्ती मौजे पालघर तर्फ मजकूर, याच्या चाकराची बाईल किल्ले रायगडास मजुरीस खपावया इमारतीकडे आली होती ऐसियासी तिणे कांहीं बदमल इमारतीस मजुरी करीत असतां केला होता ऐसियासी, नरहरी बाबाजी तर्फदार तर्फ मजकूर यासी हे हकीकत कळलियावरी ते बाइकोपासून सत्तावन घ्यावे ये गोष्टीचे तसवीस लाऊन, सूर्याजी दुंदुसकर याचे घरीं मोकळदार बैसविले की सत्तावन देणें ह्मणून तर्फदार मा। रें तसवीस लाविली आहे ह्मणून हुजूर कळों आलें तरी ज्याचा चाकर तोच येथें चाकराचा धनी आहे जे काय हकीकत असेल ते हुजूर लेहून पाठवणें त्याची विल्हे हुजूर होईल तुह्मीं सूर्याजी दुंदुसकर याचे घरीचे मोकळदार उठवणें, आणि सूर्याजी मजकुरास तेविशी तोशिस न लावणे. हें खत, कागद कुल हकीकत हुजूर लेहून पाठवणं छ १६ रबिलोवल मोर्तब सूद.