Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख शुद्ध ३ शक १७१६
ता. २।५।१७९४
विज्ञापना यैसीजे, येथील वर्तमान ताा छ १९ रमाजान रविवार पावेतों अखबार पत्र लेखन करून सेवेसीं पत्राची रवानगी केली. त्याजवरून ध्यानांस आले असेल, सांप्रत येथील वर्तमान छ मजकुरी मीर पोकद अली साहेब जादे यांस पुत्र झाल्याच्या नजरा होऊन च्यार घटिका रात्रीं बरखास जालें. छ २० रोज सोमवारों पांच घटिका दिवसा नव्या बंगल्यामध्ये नवाब बरामत जाले, पागावाले व मीर आलम व रायेरायां, मुनसी वैगेरे इसमाचा सलाम जाला. दौलाची याद केली. ते हजर जाले. कित्येक लोकांच्या नजरा जाल्या. दौला व मीर आलम यांस खिलवत होऊन येक प्रहराचे अमलांत बरखास जाले. कामाव्याचे दारोग्यास हुकुम जाला. जे साहासे कामाठी रायेचुरास पाठऊन माहाबतजंगाचे कोट्यांतील चकमकी बंदुका आणाव्या. मगरबाचे समई मीर पोकद अली वगैरे चौघे साहेबजादे यांजकडे खान्याचे खाने पा. रात्री दौलाची अज व निरखबंद गुजरला. छ २१ रोजी मंगळवारी लाल बागाचा झाडा करून प्रातःकाळी येक घटिका दिवसां नवाब आले, मीर पाकद अली साहेबजादे यांची याद केली. ते पांच घटिका दिवसां हाजर जाले. त्याची नज़र जाली. रात्री जनान्याचा बंदोबस्त होऊन कंचन्याचा नाच जाला. दौलाची अर्जी गुजरली. छ २२ रोज बुधवारी च्यार घटिका दिवसां लालबागामध्ये नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला. तीन प्रहरास कवलासाहुन आंबे २ ब हो ग्या आल ते गुजरले. रात्री दैलाचा अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ २३ रोज गुरुवारी हैदराबादेपर्यंत टपा फुले वगैरे जिन्नस येण्याकरितां बसविला. दिवसा दरबार जाला नाहीं. रात्री दौलाचा अर्जी गुजरली, छ २४ रोज शुक्रवारी तीन वटिका दिवसां नवाब लालबागामध्ये गेले. येक प्रहर पांच घटिका दिवसां मार पोकद अलीसाहेब जादे यांचे मकानास बक्षी बेगम वगैरे बेगमा तेरा रथ गेले. पांचवे दिवसाचा समारंभ जाला. च्यार घटका दिवस शेष राहता मोतियांच्या फुलाच्या बंद्या* व गजरे नवाबांनी साहेब जादे याजकडे पा, मगरबाचे समई बेगमा हवेली आल्या. रात्री दौलाची अर्जी गुजरली. छ २६ रोज मैदवारी दिवसां दरबार जाला नाही. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखनामा गुजरला. छ २६ रोज रविवारी तीन घटिका दिवसां लालबागामध्ये नवाब बरामद जाले. सैद उमरखान व जंगली वगैरेचा सलाम जाला, लालन हज्यामाची याद केली. तो हजर जाला, हज्यामत होऊन सात घटिकेस बरखास जाले, मीर सुभानअली व झुलफकर अली व तैमूर अली व ज्याहांगिर अली चौघे साहेब जादे व मनसुरजंग वगैरे मंडळीस हुकूम जाला की * षादीचे सुर्खरंगी पोषाग। घेऊन मीर पोकदअली साहेबजादे याचे मकान असावे. फराषखान्याचे दारोग्यास हुकूम होऊन जनाने देवडीपासोन दौलाचे हवेली पावेतों कनाता देऊन बंदोबस्त करावला, तन प्रहरास मीर पोकद अली वगैरे साहेबजादे येऊन हजर जाले. दौलांनीं कारचोबी पोषाग व जवाहीर खाने मीर पाकद अली यांस पाा. येक घटिका दिवस शेष राहतां दौलाचे हवेलीस जनानापुढे पाठऊन बंदोबस्त जाला. नवाब मगरबाचे समई गदीचे हाथीवर स्वार जाले. पिछाडीस सरबुलदजंग होते. मीर पोकद अली घोड्यावर, वरकडही साहेव जादे घोड्यावर स्वार होऊन दौलाचे हवेलीस आले. जनान्याचा बंदोबस्त । होऊन नवाबांनी अडीचसे खाने मिठाई व वस्ने जव्हेर नवरीस फुलें पाने या प्र सरंजाम आणून चढावा चढविला. काजीस बोलाऊन पांच घटिका रात्री मीर पाकद अली यांचा निका दौलाचे नातीशी लागला. त्यानंतर नवाब बाहेर आले. दौलाचे दिवाणखान्यांमध्ये बरामद जाले. दौला व मीर 'आलम व यहेतषामजंग व सरबुलंदजंग वगैरे लोकांच्या नजरा जाल्या. रावजी । आले. सलाम जाला. दौलांने घरबताचा प्याला आपले हाते नवाबास दिल्हा. दौला व रावजीसी बोलणें जालें. कवालाचे गायन ऐकू न येक प्रहर दाहा घाटकेस बरखास्त जाले. जनान्यांत जाऊन शरबत, खोरी व खाना जाला, येक प्रहर पांच घटिका रात्री दिवाणखान्यामध्यें नवाब बरामद जाले. मौर। पोकद अली वगैरे साहेबजादेनी नजरा केल्या. काजीस पांच पार्चे इनामत जाले. दौला व मीर आलम यांसीं बोलणे होऊन दोन प्रहर तीन घटका रात्रीस गदीचे हाथीवर स्वार होऊन रोषनाईने आतषबाजी होत हवेल' दाखल जाले. छ २७ रोज सोमवार दोन घटिका दिवसां नवाब लालबागांत आले. रात्री दौलाची अर्जी गुजरली. छ २८ रोज मंगळवार दोन घटिका दिवसां लालबागामध्ये नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला. वजीरखान पांचसे स्वार सुद्धां येउन उतरल्याचा अर्ज जाला, रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखनंद गुजरला. छ २९ रोजी बुधवारी दिवसा दरबार जाला नाही. तीन प्रहरास फराषखान्याचे दारोग्यास हुकुम होऊन जनान्याचे देवढीपासोन दौलाचे हवेलीपर्यंत कनाता देउन बंदोबस्त केला. चांदरात येकुणतिसावे तारखसे जाली. चांदरातीच्या तोफा सुटल्या. छ १ शवाली इदीचा सभारंभ होई(ल?) ता. छ २ वाल हे विज्ञापना.