Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

चत्रै वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४

विज्ञापना यैसीजे. येथील ताछि १५वर्तमान रमजान बुधवार पावेतों अखबार पत्र दाखल करून सेवेसी पत्राची रवानगी केली त्याजवरून ध्यानास आलें असेल, तदनंतर येथलि वर्तमान, छमार तीन प्रहर दिवसां नवाब जनान्यासहित दौलाचे हवेलीस आले, भोजन जनान्यांत होऊन नवाव दिवाणखान्यामध्ये बरामद जाले. दैाला व मीरआलम व आसदअलीखान वगैरे इस मांचा सलाम जाला. असद अलीखानास केडप्याकडे जाण्याची रुकसत देऊन पानदान इनायत जालें. दैला व मीरअलम यांसी खिलवत होऊन प्रहर रात्रीस आपले हवेलीस आले. छ १६ रोज गुरुवारी च्यार घटिका दिवसां लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला, मगरबाचे समई चांदणीचे फर्मावर नवाब बरामद जालें. सरबुलदंजगं व अर्जबेगी वगैरे इसमाचा सलाम जाली, लखनउचे कंचनीचा नाच होता. मना कंचनीस पुत्र जाला. तिने मान केली होती. नजर दिल्ही. मुलास नवाबान हसळी व बिंदिली इनायत केली, येक प्रहर दोन घटिकेस बरखास जालें. छ १७ रोज शुक्रवारी लाग. ( ल ? ) बागाचा झाडा करऊन तीन घटिकेस नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला, घासीमियाचे तबियतीची खबर आणिवली. तीन प्रहर दिघसा औरंगाबादेची अखबार गुजरली, मगरबाईचे समई चबुत्र्यावर चांदणीचा फरष करऊन नवाब बरामद जाले. सरबुलदंजग व खानसामाचा सलाम जाला. खानसामाच्या फर्दा पाहुन च्यार घटिका रात्री बरखास जाले. दौलाची अ गुजरली. छ १८ रोज मंदवारी तीन घटिका दिवसा लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला. (म)गरबाचे समई सरेबुलदजंग व अजमखान व दिल दारखान व अर्जबेगी व खानसामा वगैरे मामुली लोक हजर जाले. नवाब कुर्सवर बरामद जाले. सर्वांचा सलाम जाला. खानाखाने भरुन सर्वांपुढे ठेविले. सर्व इसमांनी रोज्याचे भोजन केलें. पानदान देऊन तीन घटिका रात्री बरखास जालें. हैदराबादेहुन अलीज्याबाहादुर साहेबजादे यांची अर्जी ब नजरमे वा गुजरला. प्रहर रात्री दौलाची अर्जी गुजरली. छ १९ रोज रविवारीं तीन घटिका दिवसा लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला, तीन प्रहर दिवसां दौलाची अर्जी गुजरली. मरि पाकेद अली सिकंदरजाहा साहेब जादे यांस हरमचे स्त्री पासोन पुत्र झाला, नवाबास अर्ज जाला, दौलांना नजर देण्यास येतो असी अर्जी पाठविली. रात्रीं येणें ह्मणोन हु ( कु? ) म जाला. येक घटिका रात्री नवाब चांदणींचे फर्षावर बरामद जाले. दौला व पागावाले व गफुरजंगाचे पुत्र वगैरे इसमाचा सलाम होऊन पोकद अली साहब. जाद्यास पुत्र जाला. याच्या नजरा केल्या. रााछ २३ रमजान हे विज्ञापना.