मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
र।। छ. ११ माहे षाबान डांकेवरुन रवानगी,

श्री.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचे पत्र.

विनंती विज्ञापना, नवाब छ ११ साबान शुक्रवारी जनवाड्याहुने प्यार घटका प्रथम दिवसां सवार जाले. खवासामध्ये दौला व मीर अलम हाथीरख मखमली लाल अंबारीमध्ये होते. प्रहर दिवसां वेदर येथील मंगळवार पेठेत चार पांच मुकाम करुन बोरोचीस जाण्याचा मनसबा आहे. तेथुन गंमा पेठेसही जावयाचा बेत. रंगंमा पैट ह्यणजे हैदराबादचा नीट रुख आहे. अद्यपा कोणता येक निश्चय नाही. ठरेल त्याप्रमाणे विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा छ, ११ माहे साबान हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries