मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १७९४.

विनंती विज्ञापना. दैवलाचे बोलण्यात आले की • सिकंदर ज्याहा बाहदुर साहेबजादे यांचे घादीस श्रीमंतांचे येणे व्हावें येविष हाजरतींनी श्रीमंतास पत्र लिा आहे. त्यास त्यांचे येणे घडावें हें यैन सलाह आहे. येण्यास कांह। अनमान करतील की काय ? म्हणोन विच्यारिलें. मी उत्तर केलें कीं * दोन्हीं सरकारची वाहदायस्त व येकदिल, त्या अर्थी अनमान कशाकरितां व्हावा ! मगर कांही अडचण असल्यास नकळे.' दैाला बोलले की ‘टिपु. व इंग्रज या दोन दालतदारासी सलूख व फजल इलाही घरचाही बंदोबस्त खातरख कोणतीही अडचण नाहीं. अशा प्रसंगी श्रीमंतांचे येणे होऊन परस्परें मुलाकात व घादीचा समारंभ. यांत हाजरतीची चित्तापासोन खषी, व सर्वांत चांगले दिसेल. पत्रे रवाना होतात व तुम्हीही हा मा श्रीमंतांस ल्याहावा. षादीस येण्याची इतला लौकर व्हावी. हजरत इंतजारी करतात. याप्रों दौलाचे बोलण्यांत आलें. र॥ छ. १० षाबान हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries