श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:----
‘विनंति. उपरि मीर मुरादअली वगैरे पंच यांस सरकारांतून मौजे भोडणी पा रावेर हा गांव आहे. तेथील दखलही यांजकडे सरकारची पत्रें व हुजरे जाऊन जाला. स्वराज्याचे अमलाकरितां चोपटेकरकर क।। दाराकडील आनंदराव कारकून याची कटकट भारी. बेमोईन ऐवज घेऊन उपद्रव लागतो. यास्तव नवाबांनीं सांगितल्यावरून व मुरादअली यांचे हमेषा ह्म (ण)णें कीं बंदोबस्त असा व्हावा कीं मामुलप्रों स्वराज्याचे अमलाची वांटणी जागीर सुधां व्हावी, अथवा मख्ता स्वराज्याचा ठरावा. त्याप्रों दरसाल ऐवज घेत जावा. ज्याजती उपसर्ग होऊं नये. येविषींच्या यादीही तुह्मापासीं दिल्ह्या. ऐसें फत्तेआली याचे बोलण्यांत. त्यावरून राजश्री नानांस व तुह्मांस पत्रें खानम।।र यांजपासीं दिल्हीं. व डांकेवरही हलीं रानगी केली असे. येविषीं मुरादआली यांनीं तुह्मांस व त्याजकडून तेथें गृहस्थ आहे त्यास दोन पत्रें ये॥ तीन लाखोटे पारसी पा आहेत. त्याचे त्यास द्यावे; व नाना यांस विनंति करून याचे कार्याचा बंदोबस्त करून इकडे ल्याहावें. याचे सांगण्यांत तेथील स्वराज्याचा मामुल चौथाई तीन हिसे व सरदेशमुखी सेंकडा साडे बाराप्रो आहे. याप्रों ठराऊन बंदोबस्त व्हावा, ज्याजती तोसीस सायेर फर्मास वगैरे कादार करितात ते न व्हावी. ठरावाप्रों साल बसाल फड च्या करून घेत जावा. याप्रों कादारास सरकारांतून ताकीद होऊन इकडे ल्याहावें. छ २३ जिल्हेज हे विनंति.
गोविंदराव बुरटे यांनीं पत्र मागितलें सबब.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)