श्री.
मिती शके १७१५ ज्येष्ठ शुद्ध २ सोमवार.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी,
विनंति उपारे. तुम्हांकडील पत्रें छ. १६ व छ. १८ रवानगीचीं छ. २१ व छ. २३ शवालीं पावलीं. यांजपैकीं काहीं उत्तरें पहिलीं पाठविलीं. बाकीचीं तयार जालीं. एकादो दिवसांत रवाना होतील. सांप्रत इकडील सविस्तर म।।र मध्यस्तासी बोलणें जालें, याजवर बाबाराव आम्हांकडे आले. याचा त।।, राजश्री नाना यांचे पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळेल. पेशजी इकडून रवानग्या जाल्या त्यांसहित येकंदर पत्रांचीं उत्तरें व तिकडील वर्तमान विस्तारें लेहून पाठवावें. तुमचे पत्राचे जाब उदईक रवाना होतील. र।। छ. ३० सवाल हे विनंति.
माहे १ जिल्काद उर्फ जेष्ठमास छ, २ रोज मंगळवारीं पत्रें डांकेवर रवाना,