श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसी जे---नवाबाकडे सालगिरेचे नजरेकरितां आह्मी मध्यस्तासहित गेलों. लालबागेमध्यें बरामद जाले. साहेबजादे सिकंदरज्याहा मीर पोलाद अली व सुभानअली होते. मीर आलम व पागेवाले सर बुलंदजंग आदिकरून तमाम सरदार, मनसबदार, मुतसदी हजर. सर्वांच्या नजरा जाल्या. मध्यस्तांनीं जवाहिराच्या किस्ती व पोषाग ............ दोन च्यार तन्हेचे व मिठाईचे खोन व ............ छेड्या तास बादलीनें मढवून त-हेत-हेच्या तयार केल्या त्या व चेंडू सोनेरी व रुपेरी ........ एक खोन भरून व शेहरा ह्मणजे मुडावली ( मुंडावली ? )यास तास मोत्याची झालर लाऊन तयार केली तें याप्रा खोन आणून गुजराणिले. हा सर्व सरंजाम नवाबांनीं पाहून घेतला. मध्यस्त व मी व मरिआलम समीप होतों. इंग्रजाकडील मिस्तर इष्टवट आला. कंचन्यांचे ताफेही पुढें हजर होते. नजराचे लोकाची दाटी फार. आणि लालबागेंतील मकान आटोपसीर. सबब नाच मना झाला. किल्यांतील विहिरीस मोटा लाऊन त्याचा नहर बांधून आणिला. त्याची चादर झडत होती. पांच सहा घटिकापर्यंत निषस्त राहिली. मध्यस्थ, मी व मीर आलम, ईष्टवट या चौघांसी बोलणें जालें. याचा तपसील आलाहिदा विनंति लिहिल्यावरून ध्यानांत येईल. रा. छ. १५ जिल्काद हे विनंति,
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)