श्री ६
ज्येष्ठ शु। ४ शके १७१६
रविवार ता.।१।६।१७९४
विनंती विज्ञापना. या प्रांती टोळझाड छ १५ शवाली मौजे आंदो-या- वरून छ १६ रोजी जनवाडयास मुकाम जाला. तेथुन चिटगेल्याचे रुखे कलब प्रांता गेली. लक्षावधि करोडो टोळ आकाषमार्गे जात असतां अभ्रछायेप्रो छाया पडावी. जेथे मुकाम व्हावा तेथील झाडास पान राहीना. ज्या गांवावरून टोळ झाड गेली तेथील गांवकरी वेतीबाहेर आडवे जाऊन साकर ख़बर दुध दही गुळ यात्रा। सरंजाम आणुन ठेवीत गेले. बेदराहुन तीन कोस जनवाडा येथे मुकाम जाला होता,.रा छ २ माहे जिलकाः हे विज्ञापना.