Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

श्री.
वशाखै वद्य ८ शके १७१६,

गुरुवार ता. २२।५।१७९४

विनंती विज्ञापना. टिषु दहाहजार स्वार व बारापंधरा हजार जभियते घेऊन नबाबाकडील व आपले सरहादेस आला. पुढे गुतीस येण्याचा इरादा होता. याचे वर्तमान येथे आलें वे करनुळकर अलफखान यानी पत्राचा सिलसिला ज्यारी केला की खामखा करनुलावर टिपुचा इरादा पेशकसीकारतां आहे. याचा बंदोबस्त जाला पाहिजे. त्याजवरून नबाबांनी किरकपातीक यांस लिहुन त्याचे पत्र टिपुजवळ कंपनीकडोन वकील आहे त्यास पाठवले की ‘तुह्मी आपले तालुयांतुन पुढे हरकत करणे हे गोष्ट तहनाम्यापासोन दुर आहे. जर तुमचा इरादा असाच आहे तरी आह्मी कुपणीस इतला करितो ते तुम्है। समजोन घेतील,' असे वकालाकडे गेल्यानंतर त्याने पत्रान्वयें टियुसी जाबसाल केला. टिपुचे म्हणणे की * आपले तालुक्याचे बंदोबताकरितां आलो होते. तुमची मज नाहीं तर राहिले. ' म्हणोन कांहीं जभियत गुतीस रवाना केली. व आपण खासा कांहीं जमयेतसुद्धां सिरे प्रांतास ला या प्रकारचे वर्तमान. व कहीं भ्रमही जाला आहे म्हणोन म्हणतात, मग सत्य किंवा भिध्या कळत नाही. रा। छ २२ षवाल हे विज्ञापना.