श्री
वैशाख वद्य ८ शके १७१६
गुरुवार ता. २२।५।१७९४
विनंती विज्ञापना. कडपे तालुक्यांत जमीनदारांनी हंगामा केला आहे रूणोन वेभाट आल्यावरून येथुन असदअलीखान याची वानगी के खान मजकुर कडपे तालुक्यांत जाऊन पोहचून प्रथम नारायणराज जमीदार अडक तालुक्याचा त्याचे रहाते मकान कसबे अडक जागा बाकी येका अंगास पहाड व तीन अंगास मैदान किला जमीदाने जागा मजबुत व मुस्तकीम आहे तेथे मोर्चे लाविले आहेत. जमीदार मजकुर याचाही सरंजाम किल्यांत मजबुत आहे ह्मणोन वर्तमान. याखेरीज आणिक जमीदाराची संस्थानें कडपे तालुक्यांत येणेप्रो.
१ मटलेवार उपालवाडा.
१ नासेवाले मुत्यालपाड.
१ संगापटण येमलेवाला.
१ पुललेचरु ता खमम, .
१ नरसापुर,
-----
५
अडक घेतल्यानंतर पांच मकाने पुढे घ्या तर जमीनदाराचा बंदोबस्त . मकाने कलब झाडीची आहेत. छ २२ षवाल हे विज्ञापना,