चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४
विनती विज्ञापना ऐसीजे. दौला बोलिलें की ** राव सिंदे यास दौस्ती संपादन केली याविशीं कोणास काय संशय असेल तो असे. परंतु माझे मनांतील हेत फार आहे की हिंदुस्थानांत येक साहेबजाद्यास घेऊन जाव आणि राव पंत प्रघात यांजबरोबर शरीक राहावे. याजकरितां किती वर्षापासुन राव ३८ यांचे साधनास लागलों श्रीमंतांचे आज्ञेशिवाय शिंदे ही गोष्ट कशा करतील हा संशय, त्यास श्रीमंताचे घरचे मातबर सरदार त्यांनी भीड घालुन श्रीमंतांस विनंती केली असतां अमान्य न करते या भरंवसियावा राव शिंदे यांस शिलशिला राखिला, त्यास राव शिंदे तर गेले परंतु माझे मनांतील उटउट गेली नाही. ही गोष्ट नबाबाचे पसंदी
( ती ) स येत नाहीं. कारण हिंदुस्थानांत पातशाईत दर्क करावा यास खुद पातषाहा बहोष आणि कायम मिजाज येकसुत्राने चाल असावी तर शौभा. तो प्रकार नाहीं. तेव्हां बखडा, पातषीहा बखेडे करू लागल्यावर नजरबंद करुन दौलत चालवावी. हैं। करणें प्रात्पत्वास गाजूर्दीखान हाल आहेत त्याजवर बदनामी आली त्याच फे-यांत अद्याप फिरत आहेत. याजकरिता इतके खोल पाण्यात शिरणें नको म्हणोन नवाबास इच्छा नाही. परंतु माझी हाउस आहे. या विषई येक वेळ, दोन वेळा च्यार वेळ श्रीमंतांस विनंती करीन असे करतां येखादें वेळेस तरी मनांत येईल, हा सिलसिला माझा चाललाच आहे. राहणार नाही असे बोलिलें. छ रमजान हे विनंती