श्री चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४
विनंती विज्ञापना ऐसीजे. दौला बोलिलें कीं "दोही दौलतीची दौलत खाबी कृष्णराव भिकाजी यांनी आज परियंत केली. आतां जबाब सालांत तुह्मी आहां. त्यास इश्वरनकरी व कदाचित जर दोहों दौलतीचा बिघाड झाला तर तह्मांवर शब्द आहे की कृष्णराव यांचे पाठीमागे तुह्मीं या कामांत असत अशी गोष्ट जाली असे न घडावे.'' याचे उत्तर मी त्यास दिलें कीं *आमचे काम आणखी कोणते ? श्रीमंतांचे तर नौकर आणि नबाबाचे दौलत खांब. त्यास दोहीं दौलतीची बेहबुदी आणि यगायनगतीची मज. बुती तेच आम्ही करीत असावे, ही गोष्ट श्रीमंतांस आणि नवावास रोषन आहे. पर यासी आणि आमचे घरांसी जी चाल आहे त्याची व काफियत ही मला ठाऊक आहे जे वेळेस आपण अश्यात होते ते समई आपल्या कडील दोघे कारकून आपलं १ व इमान घेऊन कृष्णरावजीकडे आले. ती पत्रे रावजींस मच वचन दाखविले. त्या मानावर रावजींनी मदारुल माहाला यासी बोलुन त्यांची पत्रे आपणांस पाठविलीं, ईश्वरकृपें करुन हा दर्जा आपणांस प्राप्त जाला यापक्षी आपले ममतेचे दृष्टीत आम्हीं असावें. आमचा हक आपल्यावर आहे. ह्या सर्व गोष्टी मी विसरलों नाही. आप खातेत हे कांहींच न येतां श्रीमंतांकडील राजदारीच्या गोष्टी आपण फायाषांत आणिल्या. मदारुमहाला याची मर्जी तुम्हांवर ठीक नाही हा उगीच आरोप आम्हांकडे ठेऊन जसे दौलत खांब आपण केले अशी आपली चाल दिसू लागली. जर मदारुमहाला यांची मर्जी आम्हांवर नाही तर . आम्हांस आपत्याकडे कशास पाठविते ? हे देखील आपले मनांत न आलें ! ..असे तथापि आम्ही आपली चाल सोडिली नाही आपल्याशी कांहीं बोलावे त र भरंवसा असा यईना की गौष्ट आपले रुचीस पडेल. लाच्यार उगच बसुन राहिलों. नूतन दौलतखांब याचा अनुभव येऊन द्यावा, आम्हीं शिलकी दौल उखब आहोंच. जे वेळेस ममतेची दृष्टी इकडे फिरेल ते वेळेस जवळच आहो असे मनांत आणुन स्वस्थ आहों. श्रीमंतांकडील वाजबी जाबसाल स्नेहाने करावे असे मनांत येईल तेव्हां आमचे काम, हैं। उमेद ठेऊन आहों. त्या अर्थी बिगाडाची सुरत जाली याचा शब्द आम्हांकडे काय ? आपण ज्या मार्गे चालवाले तसेच चालू. आपले शिवाय नाही. या प्रो बोरिल्यावर लाजतः लाजत कांही उत्तर द्यावे म्हणोन दिल्लें. समर्पक नाही. शेवटीं बोलिलें कीं श्रीमंतांस व मदारुलमहाला यांस जे लिहिणे ते लिहावे आणि ज्यांत दही दौलतीची बेहबुद से करावें.'' या दोन च्यार घाटका लणें जालें तें
शेवटी लिहिलें असे. रा छ माहे रमजान हे विज्ञापना.