श्री. चैत्र वद्य ९ शके १७६६,
ता. २४।४।१७९४
विनंती विज्ञापना होसीजे. बेदरचे राहण्याचे प्रसंगावरून दौला बोलिले की "श्रीमंत व नबाब उभयतांची ऐक्यताचे आहे. मदारुलमहाला यांची माझी चित्तशुद्ध नाही. याविस त्याचे चित्तांना सफाई करावी असे आलें तर यास उशीर लागणार नाही आणि सफाई न होतां जिदीवर आले तर इतकी जिदी करावी असे त्याचे की काही केलेही नाही. मगर जुजवियात यास फारनीकसी केली तर आदवनी आणि च्याहारुमचा पैका मागतील त्यास पंतप्रधान व नवाव दोन्ही दौलती वाहीद मदारुमहाला याचे माझे येक अंतःकर्ण असल्यास करोडो रुपयांची किफायत करून दाखवीन. नबाबाची किफायत याचे दौलतीतील यका रुपयाची केली तर पंत प्रधान यांची किफायत आठ आण्याची करीन. पंतप्रधान याचे दौलतीतील किफायत येका रुपया केली तर तेथे नबाबाची किफायत आठ आण्याची करून दाखवीन, येक वेळ अनुभव तरी पहावा. याचे दोन प्रकार दोही सरकारचे जुजवियातचा लढा उलगडून टाकावा. नंतर येकवर्ष होऊन द्यावे. त्यांत माझी परीक्षा पाहावी. अथवा जुजावयात इतके दिवस राहिली तशी आणखी येक वर्ष अशीच राहुं छावी, मदारुलमहाला यांण सफाई अंतःकरणपूर्वक करावी. माझी चाल कशी
ही येक वर्ष पाहून अनुभव घ्यावा. जर सचोटीस उतरलो तर उत्तम जालें, नाहींतर आपण आपले ठिकाणी मुखत्यार आहां. दोहींतून जसे मजस येईल तसा अनुभव पहावा. मध्ये उगीच खलष आहे हा ठेवणे मुनासीब नाहीं.'' ह्मणेन बहुत विस्तारै करून बोलिले, आणि लिहावयास सांगितले. त्याजवरून लिहिले आहे. आज्ञा येईल त्याप्रमाणे यासी बोलण्यात येईल. छि रमजान
हे विज्ञापना.