श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७।४।१७९४
विनंती विज्ञापना. छ १७ रमजानी दौलांनी रात्री आह्मांकडे रुका पाठ विला की हजरतीकडून षादीचे मुकदम्यांत खरीता राव पंतप्रधान व मदा' रुल माहाला व हरी पंडतजी यांचे नांवें पत्रे गेली होती. त्याचे जबाब रघेत्तमराव यांचे विद्यमाने आले आहेत. ते हजरतीनी मुलाहिजा करून कि. त्येक माार तुझांसी बोलावयाकरितां ईद केला, त्यास मी अर्ज केला की यविषीचा रुका लेहुने रावजीकडे पाठवितो. ईषद जाने की ** रुका न लि. हितां त्यांजला आपले येथे बोलाउन ईषद बमोजीब त्यांसी मार बोलण्यांत आणुन त्यांजकडोन राव पंत प्रधान यांस व मदारुलमाहाला यांजला पत्रे लिहवुन व तुम्हीही पत्रे त्याहावी. याजकरितां उदईक आपण यावें " म्हणोन लिहीले. त्यावरून आम्ही छ १८ रोजी दीडप्रहर दिवसां दौलांकडे गेले. ते मार्गप्रतीक्षा करीत होते. सर्वत्र मुत्सद्दी मंडळी वगैरेस जबाब दिल्हाच होता. आम्हीं जातांच खिजमतगार वगैरेस दुर करून दौलांनी माार केला की ६ षादीचे मुकदम्यांत राव पंतप्रधान यांस व मदारुलमाहाला आदिकरून पत्रे षादीस रौनक अफजा देण्याविषयी लिहून रघत्तमराव यांचे मारफत पाठविली होती. त्याचे जबाब हाल झाले त्याप्रमाणे दान पत्रे येक मदारु लमहाला यांचे में येक गोविंदराव भगवंत यांचे यकृग दोन मत्रे वाचून पाहिली त्यास याचे मसविदे पेशजी तुमचे विद्यमाने आले होते त्यांवरून मजकूर समजलाच होता. तथापि दोन्ही पत्रे वांचून भाव समजला की षादीस येण्याविषय टाळा देऊन अस्ताचा बहाणा करून लिहिले आहे की राव पंतप्रधान प्रथम स्वारीस निघणार तेव्हां *साअतनेक पाहिजे. ते नाही. तेव्हां शुक्राचा अस्त व मंगल वक्री. तेव्हां येणे कसे होईल ? असे भाव लिहिले आहेत. याजकरितां हाजरतास संतोष वाटला नाही व मजला ईषद केला की रावजीस बोलावून तुह्मीं व ते येऊन याचेवर जबाबाची तजवीज ठराऊन त्याजकडोन विस्तारें पत्रे लिहवावीं की आमचे येथे नजुम विशेष करून जाचून । पाहण्याचा संप्रदाय नाहीं. लग्नाची तारीखही मुकरर केली नाहीं. राव पंत प्रधान याचे येण्याची अमद पाहून मग तारीख करार करावी. त्यास प्रस्तुत तिकडील उत्तरांत अस्ताचा साब लाउन लिहिले आहे त्यास तेथे नजुमी व गणक वगैरे ब्राह्मण चांगले आहेत, त्यांस विचारून पादाची तारीख व रात्र पंतप्रधान यास बाहेर स्वारीस निघण्याचा साअतनेक पाहून आह्मांस इतला करावा ह्मणजे त्या प्रमाणेच वादीचा निश्चय करण्यांत येईल. सारांप शादीची खुषी व राव पंतप्रधान याचे भेटीचा हेत फार आहे व यांचे येण्यांत रौनक अधिक होईल. जेब बजावत येईल. याजकरितां रावजा कडून राव पैसे प्रधान यांस व मदारुलमहाला यांस पत्रे लिहवावी व आमचे तर्फेनही ल्याहावें ह्मणोन ईद केला. त्यास तुह्मी विस्तारयुक्त ल्याहावे व हजरतीचीही पत्रे तयार करवितों. हजरतीस राव पंतप्रधान यांचे भेटीचा इषनियाक फार आहे हे गोष्ट जरूर घडावी ह्मणोन दौलाचे बोलण्यात आले. आणि अन्वये सरकारचे खरीत्याचा जबाब नबावाकडून थैली दिल्ही ती पाठविली आहे, राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसी प्रविष्ट करतील त्याजवरून ध्यानात येईल. रा।छ रमजान हे विज्ञापना,