श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६.
तप्रिल ता. १७९४ इ.
विनंती विज्ञापना, बेदराहुन कुच करून हैदराबादेकडे जाण्याचा बेत नबाबांनीं योजिला होता. यास सलाह बेगमा आदि करून सर्वांचे संमत. फारासखाना वगैरे कुल तयारीतही डौल जाला, बाजारांत तमाम साहुकार लोक वगैरे हैदराबादेकडे नबाब जातात हे खबर गरम जाली. दौलास समजल्यानंतर त्यांनी खिलवर्तीत नबाबांस अर्ज केला की हैदराबादेकैडे सवारी मुबारक मुतवजे होण्याची दाट गुलबाग जाला आहे. हे गोष्ट कुलयातीस दुरुस्त नाहीं. लोकांतही हा गुलबाग होणे खुषनुमानारी. याप्रमाणे तीनच्यार घटका नवाबाचे व दौलाचे बोलणे होऊन ताकीद सर्वास जाली की हैदराबादेकडे कुच असे कोणी आणेल त्याचे पारिपत्य होईल. हे ताकीद जाल्यावरून तुर्त हैदराबादेस जाण्याची चर्चा राहिली बेदरची छावणी हेच बोलवा जाली आहे. इतक्यावर जे पाहण्यांत. ऐकण्यात येईल त्याची विनंती लिहि• ण्यात येईल, नवाबानीं यकदोन वेळ दौलास झिडकारुन सांगितले की माझी कुलियात मी संभाळून घेईन, बिगडावयाची नाहीं, तुह्मासाठी मी आपली कुलियात बिगडु (२) की काय ? तुमचे आणि मदारुल माहाला यांचे ठीक नाहीं. तुह्मीं येथे रहावे. तेव्हां यांच्याने पुढे बोलवेना. त्यास येक दोन दिवस जाउ दिल्हे नंतर जाऊन अर्ज केला की हजरतीस जेव्हां जाणे असेल तेव्हां जावें, सरंजाम लांब नाहीं जवळपासच आहे. परंतु आजपासोन जा' ण्याचा पुकारा आणि शोहरत बेतन्हा होणें हें खुषनुमा नाहीं. ' त्याजवरुन सर्वांस ताकीद जाली. चैकीचे लोकांची छपरबंदी करावयास हुकुम जाला, षोहरत जाली होती ते मोडली. पुढे शहरांत जावत न जावोत. वैशाखाचे महिन्याची संधि आहे. त्या महिन्यांत गेले तर जातील नाहींतर जात नाहींत. छावणी करतीलसे वाटते. र॥ छ १३ रमजान हे विज्ञापना.