श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना, घासी मिया याची तबियत बहुत कसलमंद. नित्य दहा, बारा पंधरा दस्त होतात. नबाबांनी चंपाअसील नेहेमीं मियापास जवळ बैसऊन हकीमाकडुन दवा देवितात. दोन दोन घटिकेस घासीमयाचे तबियतीची खबर आणवितात. येक दिवस हुशार येक दिवस बेआराम याप्रमाणे मियाचें तबियतीचा अहवाल आहे. रा छ, १७ रमजान हे विज्ञापना.
सदर तारखेच्या डांकेवर व्यंकटराम दीक यांजकडून चेनापटणाहुन आलेली अखबार गोविंदराव भगवंत यांचे मार्फत रवाना केल्याचे पत्र.
छ. ११ ते छ, १७ पावेतों मामुल रोजनामे अखबार ( पृष्टांक ३८७ ३८८)
छ २३ रोजी डांकेवर. श्रीमंत रावसाहेब यांस मामुल हवाल्याचे पत्र.