श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६.
ता. १४ एप्रील १७९५ ईसवी.
विनंती विज्ञापना, पो. उमरखेड पासीन शहा मिज याने यैवज घेतला, तो सरकारांत नबाबाकडून येणे, त्यास दौलाचे ह्मणे की येहंतषामजंग जफ रुदौला यांनी चाळीस हजारचा तमसुम लेहुन घेऊन फारखती आपाजी कों बाजी कारकुनी श्रीमंताचे सरकार तर्फेने याजाबसालास जफरुदौलापाशी आला ते समयीं घेतली, ते बजानस आहे, त्या बमोजीब चाळीस हजाराची तनखा प्रों, वसमतेवर यांनी दो घायद्याची तयार केली. त्या पैकी पहिले वायद्या बाा, वीस हजार रुपये परगणे माार चे अमोल बाजीराव व सैद मुनवरखान यांना मजे कडे यैवज दिला तोघे ऊन रसद अमलाचे नावे मी दिल्ही की “शहामिर्जा यानें उमरखेडापासोन यैवज घेतला ता नबाबा कडून श्रीमंताचे सरकारांत येणे त्या यैवजी चालीस हजारांची तनखा तुम्ह वर जाली त्या पैकी पहिले वायद्याचे वीस हजार राों आम्हांस पावलें " या प्रों रसीद मोहगम देऊन यैवज घेतला. पुढे दुसरे वायद्याचे वीस हजार घेऊन रसीद सालिनात खानाचा यैवज पावल्याची द्या यैसे वसमतकर अमीलाचे बोलणे पडलें. ते समई हा मार राजश्री गोविंदराव भगवंत यांस लिहिला. त्यांनी राजश्री नानांस विनंति केली त्याची आज्ञा ज ली. पत्रही मला आले की शाहा मिर्जा याने उमरखेडोपासेन यैवज बहुत घेतला यैसे असत चाळीस हजारावर फैसला होणार नाहीं, आपाजी कोडाजी पासून जबरदस्तीने जफरुदौलांनी फारखत घेतली. ते सरकारांत कबूल नाही, यास्तव पहिली वीस हजारांची मोहगम रसीद दिल्ही. त्या प्री रसीद देऊन यैवज येत असल्यास घ्यावा. सालिना रसीदीचा आग्रहच करू लागल्यास पहिले वीस हजार घेतले आहेत ते फिरोन द्यावे, या प्रों आज्ञा जाल तेव्हां बीस हजार दुसरे वायद्याचे वीस हजार अमीलांनी आणिले ते रसीदाचे दिकती करिता घेतले नाही. सांप्रत हा जाबसाल दौलाशी बोलण्यात आणिला की शाहामिर्जा बाबत आपल्याकडे सरकारचा यैवज येणे आपण वसमते कडून चाळीस हजार देविले त्या पैकी वीस हजार पेशजी घेऊन रसीद अमीलाचे नावे दिली. दुसरे घायद्याचे वीस हजार रुपये अमोल आम्हांस द्या म्हणतात त्यास सरकारांत में विषईची विनंति लिहिली. आज्ञा जाली की शाहामिर्जा बाबत मुबलक येथे आपाजी कोंडाजी पासोन जबरदस्तीने जफरुदौलांनी चाळीस हजाराचा तकसुम देऊन फारखत घेतली ते सरकारांत मंजुर नाहीं जो यैवज उमरखोडापासोन घेतला त्याचा फडशा जाला पाहिजे. याप्रों आज्ञा आहे. याचे उत्तर दौलांनीं केले की हे जाबसाल आहेत. तर्फेने सरकारने विध्यारे पुढे जसा निर्णय ठरेल तसा ठरो. तुर्त यैवज आला तो घेण्याची तुह्मापासीं अमानत असो द्यावा. त्यास पेशजी वीस हजार घेक्ले आहेत. बाकी वीस हजाराच्या हुंड्या आल्यात्या सावकारांचे दिवाळे । निघालें, याज करितां त्या हुंड्या फिरोन दिल्या. त्यास मोघम रसीद घेऊन वीस हजार दिले तर यैवज घेतो. नाहीं तरी घेत नाहीं, राा. छ. १७ रमजान है विज्ञापना,