श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७१४ ईसवीं.
विनंती विज्ञापना. हैदराबादेहून आलौज्याहा बाहादुर साहेबजादे याची अर्जी नवाबास छ १० रमजानी आली. त्यांत, शहरात गिराणी तांदुळ सात शेर व जोरी दाहा शेर जाली. करोड्याकडील बोभाटही लिहिण्यावरुन तेजसिंग हजारी यांस हुकुम जाला जे तुह्मी दाहा स्वार पाठवून करोडा नूरमहंमद याचा नायब तेथे आहे त्यास धरून आणावें. हैदराबादेहुन अर्जी आली ती नवाबानी दैालांकडे पाठविली. असीले हात दौलाकडे निरोप पाठ विला की जनवाड्याचे मुकामी तुला करार केला होता की पंधरा दिवस धारण तांदुळ सोळा शर, व जोरी चोवीस शेर कारतो त्यास किती दिवस जाले ? या उपरी करोडा अथवा मारवाडी वाणी कोणी याचा मुलाने होणार नाही. याप्रों मोटें रागाने सांगेन पाठविले. दौलांना नुरजाहंद खानास बोला उन आणून गोडवे गाईले. याप्रो जालें रा छ १३ रमजान हे विज्ञापना.