श्री.
चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना. छ ७ रमजानी राजाराम मादी रायरायाकडील, त्याचे गुमास्त्याने येक तेल्यापासून पांच पले तांदूळ दर पल्यास साडेबारा रो। प्रो खरीदी केले. त्यांपैकीं येक रुपयाचे तांदूळ नवाबाकडील असीलेस पंधरा पल्याचे भारानें आठ शेर वजन करुन दिल्हे. असील घरास तांदुळ घेऊन आली. घरी वजन केले त साडेसातशेर भरले. असीलने बक्षी बेगम यांस अर्ज केला, त्यांनी नवाबाचे समक्ष तांदुळ आणून वजन करुन पाहिले त साडेसात शेर भरले. बेगमांनी अर्ज केला की बाजारचे मारवाडी याप्रमाणे मनास येईल तसा विक्री करतात. वजन खाटी, नबाबांनी फौजदारखान यांचे मार्फत गंजाचे बाजारांतून येक रुपयाचे आणिक तांदुळ खरेदी करुन आणविले. ते चौदा का पल्याचे भावाने नाबानी रुबरु वजन करविले. नउ शेर रुा भरले व तांदुळ चांगले. मोद्याचे गुमास्त्याचे व तेल्याचे कृत्रिम) सम (ज)ले. तेव्हां मोद्याचे गुमस्स्या ची गर्दन मारण्याचा व तेल्याचे नाक (का न घेण्याचा हुकुम झाला, मोद्याचे गुमस्त्यास गढवावर बसवोन वासलगंज. बाहेर नेऊन गदन मारविली. तेल्याचे नाक कान घेतले; त्याने विहिरीत जीव दिल्हा, याप्नों जालें, राा छ १३ रमजान है विज्ञापना.