श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १७९४.
विनंती विज्ञानपा. नवाब जनवाड्याहून कुच करुन छ, ११ साबानीं बैदर येथील मंगळवार पेठेत येणार. कारखान्यास तमाम हुकुम जाला षादीचा समारंभ होणे त्यास जागा प्रशस्त पाहिजे. बेदरचे किल्यांत पहिले नवाब होते ते जागा अडचणीची, व जनवाडा येथे केवल संचित, जाणून मंगळवार पेठ येथील झाडुन लोकांची घरे खाली करऊन नक्षा करुन राज्याजींनी आणोन दाखविला. नागझरी पाटी घेऊन भेवता बाडा दीड कोस देन कोस पर्यंत बसउन बंदोबस्त करविला. साहेब जादे यांची यादी रमजानचे महिन्यांत व्हावी, अद्याप षवाल! अद्याप मुकरर जालें नाहीं. परंतु तयारी सरंजामाची व्याबज्या ताकिदी करुन होत आहे. मंगळवार पेटेंत नवाब आल्यानंतर काही दिवस राहुन बारोंचीस जाण्याचाही बेत भाहे. तेथील पैर षिकार करुन फिरून मंगळवार पेठेत येणार. तदनंतर पादीची शुरुवात, यैसेही आहे. होईल त्याप्रा विनंती लिहिण्यांत येईल. नवाब बोलले की ' मंगळवार पेठेत तुमचे येथे आह्मीं राहावयास येतो'. मी उत्तर केले की आम्ही राहतो तेथे आपण येऊन षादी करतात वाजपेक्षा अधिक काय आहे ! ज्या जाग्याचे नसीब थोर म्हणोन हजरतीचे मनांत आलें. हे बोलणे यैकुन संतोष मानला. राजे रायेरायां यांस सांगि. तले की किल्यांतील हवेल्या यांस राहावयास खाली करुन द्याव्या. त्याजवरुन देशपांडे आदिकरून मुलें माणसे काढावयाचा झिकर. ती जागा पाहावयास मी गेले होते. देशपांडे यांचे वरचे पैनास मनुष्य कुटुंबाचे आहे. बायका पेरें येकच कलकलाट जाला. त्यांनी निघोन दुसरें ठिकाणी राहावें तर बर्यिकीपेरें आणि असबाब कोठे ठेवावा? ठिकाणा नाहीं ! सरकारची तर सख्ती! तेव्हा त्या देशपांडे यांचे मी समाधान केले. त्यांचे दुःख पाहावेना ! बाहेर येक आंबराई पाहून डेरे देऊन तेथे राहिलो. नवाबांनी सांगून पाठविलें कीं घरांत जाऊन राहिला की नाही ? जर नाही ह्मणावे तर वाईट मानतील की * आह्मीं मंगळवारांत यांचे जाग्यावर राहिले हे वाईट वाटलं, याजकरितां बाहेर राहिलें.' यास्तव सांगोन पाठविले की त्या जाग्यांत पडझड फोर जाली. मरमत करावयाची, तृर्त तयार होण्यास चार दिवस लागतील. याजकरिता भामराईत राहिले. याप्रा गरीबगुरबा यांस अतिशय उपद्रव! लिहिण्यांत किती ल्याहावे ? समा जाली ! छ १० षाबीन हे विज्ञापना,