श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १२९४.
विनती विज्ञापना. नवाबांनी बोलण्यांत आणिलें की * सिकंदर ज्याही बाहादूर यांचा प्रादी करण्याचा निश्चय जाला. त्यास या पादीचे समारंभांत राव पंत प्रधान यांनी येण्याची यैनसलाह आहे. रात्र पंत प्रधान यांस पाहावे हैं बहुत दिवसांपासुन आमची खाहेब आहे, त्या गोष्टीचा इत्यफाक या वादीचे खुषीचे समारंभांत घडावा हैं फार चांगले पैसे समजोन राव पंत प्रधान यांस आह्मीं पत्र या मुकदम्याविषई तयार करविलें खाना होत आहे. तुत्व हे मरातब मुफसल लेहुन त्याचे येण्याची इतला लौकर करावी. दोन्ही रियासतीं पुस्तैन पासान येक जुदाई नाही. त्या अर्थी राव पंत प्रधान यांनी अनमान न कारतां षादीस जातीने यावे हे त्यांस लाजम आहे. याप्रा। बोलण्यात आले. या प्रकण पत्रे यांनी राजश्री रघोत्तम राव यांजकडे रवाना केली आहेत. त्यास विनंती की येविषीं बोलण्याचा प्रकार आज्ञा येईल त्या मी बोलण्यात येईल. 'आपले सरदार व मुतसदी सुधां येऊन लग्नाची शोभा करावी' ह्मणेन हौसेने सांगुन बोललें की याचे उत्तर लौकर आणवावे. तेपर्यंत पोदीची तारीख मुकरार करीत नाहीं. च्यार दिवस पाद लांबवावयास येईल. चिंता नाहीं. येण्यास फार दिवस लागतील, आणि शाद तर लैकर होणार' असे कदाचित ह्मणतील तर त्यांचे येण्याचा सुमार पाहुन मग तारीख ठरण्यात येईल. पंत प्रधान यांचे येण्यांत दोन खुब्या. येक तर, जन्म त्यांचा जाला त्या दिवसांपासोन त्यांस पाहावें ही उत्कंठा. दुस, त्यांचे षादीस सिकंदर ज्याहा गेले; यांचे प्रादास राव पंत प्रधान आले. ६ दौलतीची असी वाहदीयेत याचा लौकिक दिगांत होईल. विलायेत पर्यंत सर्व दौलतदारांनी आश्चर्य मानावे, ही दुसरी खुवी, यास्तव येणें व्हावे, याची इंतजारी आहे. याप्राा तावर लिहुन लौकर उत्तर आणव म्हणौन सांगितले, त्याजवरुन लिा आहे. सदरहुचा जबाब विस्तारै करुन यावा. त्या अन्वयें यांसी बोलण्यात येईल. ॥ छ, १० षाबान है। विज्ञापना,