श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १७९४
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचे पत्र.
विनंती विज्ञापना, छ. २ साबान बुधवारी रात्री दौलांकडे मी सरकारचे थैलीपत्र सिंदे प्रकर्मी नव.बाम आलें ते द्याव पाकरितां गेलो. मीर आलमही होते. मी आल्याची इतला दौलांनी नवाबास अजी पाठविली. त्याजवर दसे. खत होऊन आले की बरामद जाल्यानंतर फलाण्यास आह्मांकडे पाठवणे. नवाब बरामद होऊन चोपदार येतांच मी नवाबांकडे गेलो. जात समई दौला बोलले की हाजरतापासीं जाऊन तथुन फिरोन मजकडे आपण यावे. नत्राबांकडे गेलो दरबार जाला होता. नाचही होत होता. सिकंदर ज्याहा साहेब जाद यांचे षादी चा निश्चय जाल्याच्या नजरांही लोकांनी केल्या. सरकारचे थैलीपत्र नवाबांस प्रविष्ट केले त्याजवर नवाबाचे बोलण्यात आल्याची ता विनंति अलाहिदा पुखणी पत्रीं लिया आहे त्यावरुन ध्यानात येईल, । छ. १ ०बाबान. हे विज्ञापना.