श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.
विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकट रामदीक यांजकडील अकबरा दोन आल्या. त्या रवाना केल्या आहेत. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करितील. अवलोकने मार ध्यानात येईल. उत्तरा विषई आज्ञा जाली पाहिजे, रा छ ४ पाबान हे विज्ञापना.