श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४,
विनंति. करनुल संस्थानचा अधिकार अलफखान याजकडे जाला. त्याजकडुन रणदुलाखान येथे येऊन करनुलास गेल्यानंतर अलफखान व रणदु लाखान या उभयताचे वयमनस्य येऊन सांप्रत रणदुलाखान व अकबर अलीखां ह्मणोन रणमस्त खानापासुन मातबर त्याचे सलाह मसहलतींत होता त्यास व मुस्तफांखान यां त्रिवर्गास अलफखानानी कैद केले. लोकांस नित्य उपद्र(व) तालुक्याची खराबी, कुणी चांगला राहिला त्यास नागवणे. याप्रमाणे जालमी व जलालीची चाल अलफखानाची ऐसें वर्तमान नवाबांकडे आले, सा छ, ४ पाबान हे विज्ञापना.