श्री.
माघ व. १२ गुरुवार शके १७१५ ता. २७ फेबुवारी १७९४.
विनंती विज्ञापना. रणदुलाखान करनुळकर यांचें पत्र दौलास आलें. त्यांत वर्तमान लिहिलें की 'टिपु पटणाहुन निघोन मांगडीस आला. तेथील किल्याचा बंदोबस्त करुन बागेरुलास दाखल जाल्याची बातमी आली, पुढें कोणीकडे इरादा करील नकळे! करनुल बाबत पेषकसाचा जाबसालही त्याचे चित्तांत आहे, तेव्हां कसें पडेल ? याप्रो भयाभीत होऊन लिहिलें तें पत्र दौलांनीं वांचून पाहून बोलले की 'आतां टिपु पासोन भय वागवावें ऐसें नाहीं. अथवा त्यानेंही इकडील भयाचा अंदेश करावा ऐसें राहिलें नाहीं. याप्रो बोलले. उगेच वर्तमान समजण्यांत आले त्याची विनंती लिहिली असे, रा। छ २६ रजब हे विज्ञापना.
श्री.
माघ १. १२ गुरुवार शक १७१५ ता. २७ फेब्रुवारी १७९४.
विनंती विज्ञापना, सांप्रत लस्करांत धारण वजन पक
सदरहु प्रमाणे धारण छ २५ रजब आमखास बाजारांत जाली. यापूर्वी च्यार दिवसांमागें या निरखाहुन कमी सेर दीड सेर धारण होती, ती हल्ली महसुलांत अडीच आणे सूट पडली, सवय ताकीद करोडे वगैरेस होऊन । धारण हाली असा आहे. याजहुनही पुढे सेर दोन सेर जास्त करावी असी ताकीद आहे. रा छ, २६ रजब हे विज्ञापना,