श्री.
पौष व. ७ गुरुवार शके १७१५ ता. २३ जानेवारी १७९४.
विज्ञापना. यैसीजे. येथील वर्तमान ता छ १८ माहे जाखर मंगळवार पावेतों अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्राची रवानगी केली त्यावरून ध्यानांत आलें असेल. तदनंतर येयील वर्तमान छ. मारीं रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. उदईक कुच करावयाचें ह्मणोन त्यांची अर्जी दसखत होऊन आली. चार घटिका रात्रीं आदवनी राये चुरचें वर्तमान आलें कीं दारा ज्याहा माहाबतजंग यांचा वाका जाला. त्यावरून नौबत मना जाली छ. १९ रोज बुधवारीं प्रातःकालीं सवारीचा हुकुम होऊन लवाजिमा हजर जाला. जनान्याचे रथ पुढें वाटे लाऊन नवाब पांच घटिकेस दिवाणखान्यामधें आले. दौला व मीर आलम व पागावाले व रायेरायां व असदअअलीखां वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला, हाथीवर अबारीमधें नवाब सवार जाले. खवासामधें दौला व मीर आलम होते. वासल गंजाचे दरवा. ज्यानें सवा प्रहर दिवसां बेदरचे हवेलीस किल्यांतील दाखल जाले. गांवांत दाखल होते समई येक स्वार विहरींत घोड्यासुद्धां पडला. दुस-या दरवाज्यांत दाटमुळें दोन माणसें जायां जालीं. रा छ. २० जाखर हे विज्ञापना.
छ. २२ जाखरीं डांकेवर.