श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता २० दिसेंबर १७८३.
विज्ञापना येसीजे. येथील वर्तमान ता। छ १० माहे जाल मंदवार पावेतों अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्रीं रवानगी केली. त्यावरून ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान, छ मारीं प्रात:काळीं नवाब बेदार जाले. असीलास दौलाकडे पाठऊन त्यांचें तबियतीची खबर आणविली. तीन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन जनान्यासहित शिकारीस गेले. शिकार जाली नाहीं. दोन प्रहरास डे-यास आले. रात्री खैर सला. छ. ११ रोज रविवारीं दिवसां दरबार जाला नाहीं व नवाब शिकारीसही गेले नाहींत. दौलाची तबियत फार अस्वस्थ होती, त्याची खबर वरचेवर असीलासीं आणवीत होते. मीर आलम व हाकीम महमदमाखां उभयतांस त्यांजपासी नेहमीं असावे. या प्रा। हुकुम जाला. छ १२ रोज सोमवारीं दोन घटिका प्रथम दिवसां नवाब सवार होऊन जनान्याचे बंदोबस्तापहित शिकारीस गेले. शिकार जाली नाहीं. त्यानंतर येदलाबाद ह्मणोन येक गांव आहे तेथें स्वारी गेली. पाटलाचे बायकोनें स्वयंपाक करून अन्न आणिलें तें घेऊन तिजला इनाम द्दिल्हा. येक प्रहर च्यार घटिकेस डे-यास आले. दौलाची खवर अशीलास पाठऊन आणविली. रात्रीं खेरसला. छ १३ रोज मंगळ. वारीं पांच घटिका प्रथम दिवसां खावगामधें नबाब बरामद जाले. दौला जवळचे वाटेनें म्यान्यांत बसोन आले. त्यांनीं नजर केली. पांच सांत इसमांचा सलाम जाला, दौलांसी क्षणभर बोलोन त्यांस वाटे लाविलें. नबाब साहा घटिकेस स्वार होऊन शिकारीस येदलाबादेकडे गेले. दोन प्रहर तीन घटिकेस डे-यास आले. दौलाचे प्रकृतीची खबर आणविली. रात्री पांच घटिकेस नबाब बरामद जाले. सरवुलंदजंग व घासीमियां व अजमखां वगैरे इसमांचा सलाम जाला. दिलदारखां व मुरादअलीस हुकुम जाला जे दोन चित्ते घेऊन वाड्याबाहेर हरणाची शिकार करून घेऊन येणें. चोबी बंगला दौलाचेथें उभा करण्याची ताकीद जाली. येक प्रहाराचे अमलांत बरखास जालें. छ १४ रोज बुधवारीं प्रातःकाळीं दौला चेथें चोबी बंगला उभा राहीला. त्यांनी फरास व कामाठी नवाबांकडील यांस इनाम शंभर रु. दिल्हे. दोन घटिका दिवसां नवाब जनान्यासुधां स्वार होऊन अमलापूरचे जंगलांत शीकारीस गेले. भोजनादि तेथेंच होऊन दोन प्रहर दोन घटिकेस डे-यास आले. दिलारखान व मुरादअली यांनी वाड्याबाहेर च्यार हरणांची शीकार करूर गुजराणली. दौलाची तबियत कांहींसी स्वस्थ जाली ह्मणून राज्याजी, रोशनराये, समशेरवंत वगैरे त्यांचे लोकांनी त्यांस नजरा केल्या. रायेरायां याचे बंधू अप्पाराव कुटुंबासुद्धां माहुरची यात्रा करून आले. याचा अर्ज जाला, रा। छ १६ माहे जावल हे विज्ञापना.
छ २४ जावलीं डांकेवर पुण्यास
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९२.
श्रीमंत रावसाहेब यांस छ. २४ चे मामुली हवाल्याचें पत्र